
*स्वतंत्रदिनी ग्रामपंचायत देऊळगाव मही येथे देण्यात आले चक्क पिणाच्या पाणासाठी निवेदन*
*सात कोटी पाणी फिल्टर महाजल योजनेचा पाणी पुरवठा सुरळीत होणार कधी…?*
१०दिवसात पाणी नाही आले तर तीव्र आंदोलनाचा इशारा..
धरण उषाशी आणि कोरड घशाशी..
देऊळगाव मही :-गेल्या तीन ते चार वर्षांपासून काम चालू असलेल्या ७ कोटी पाणी फिल्टर महाजल योजनेचे काम पूर्ण झाले असून गावात पाणीपुरवठा सुरळीत होणार कधी असा प्रश्न देऊळगाव मही येथील वार्ड क्रमांक सहा मधील नागरिकांना पडला आहे.
आनंद नगर मधील दहा पंधरा घरांना दोन महिने झाले पिण्याच्या पाण्याचा एक थेंब सुद्धा मिलत नाही.
देऊळगाव मही गावाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने ग्रामस्थांना पूर्वीपासून भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता.ही परिस्थिती शासनाने लक्षात घेऊन देऊळगाव मही गावासाठी खडकपूर्णा प्रकल्पावरून ७ कोटी पाणी फिल्टर महाजल योजना मंजूर केली.या योजनेचे काम तात्काळ पूर्ण केले मात्र वार्ड ६ मधील १०ते१५घरांना दोन महिन्यात पाणी नाही ७ कोटी पाणी फिल्टर महाजल योजनेत बसत नाहीका असा प्रश्न वार्ड ६ मधील नागरिकांना पडला आहे.
तरी ग्रामपंचायत कडून काहीच उपाय योजना केली जात नाही.
आम्ही खालील सह्या करणार विनंती पूर्वक तक्रार निवेदन देतो की वरील विषयाला अनुसरून आम्ही सर्वांनी वेळोवेळी लेखी व तोंडी तक्रारी येथील ग्रामपंचायत कार्यालयात केल्या होत्या पण त्याचा काही उपयोग झाला नाही ग्रामसेवक, सरपंच व वार्ड मेंबर यांना वेळोवेळी फोन करून प्रत्यक्ष भेटून वरील समस्या सोडविण्यासाठी सांगितले पण ते म्हणायचे हो पाच सहा दिवसांत करतो असे दोन महिने झाले तरी अजून कोणतीच उपाय योजना यांचे कडून झाली नाही तरी क्रुपया आपण आमच्या या गंभीर पाणी प्रश्नावर तोडगा काढून असलेला पाणी प्रश्न निकाली काढून आम्हाला न्याय द्यावा नाहीतर
वरील पाणी प्रश्न आपण निवेदन दिल्या पासून दहा दिवसात सोडला नाही तर आम्ही सर्व जण ग्रामपंचायत कार्यालय देऊळगाव मही येथे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा येथे देत आहोत याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांचेवर राहील
सह्या
1). अशोक दगडू शिंगणे
2) शंकर जानकीराम शिंगणे
3) तेजराव जानकीराम शिंगणे
4) सुरेश दामोदर शिंगणे
5) रमेश दामोदर शिंगणे
6) जगन्नाथ दामोदर शिंगणे
7) नितीन देशमुख
8) शिवाजी वायाळ
9)नंदकिशोर वायाळ
10) शशिकांत राजपूत
11) लोहार मामा
12) शिंदे दाजी











































