Home विदर्भ शेतक-यांनो यंदा घरीच साजरा करूया पोळा

शेतक-यांनो यंदा घरीच साजरा करूया पोळा

472

वडगाव जंगल पोलीसांकडुन शेतक-यांना आवाहन

देवानंद जाधव

यवतमाळ / अकोला बाजार : – सध्या कोरोना आजाराने सर्वत्र थैमान घातले असुन ग्रामीण भागात देखील कोरोनाचा प्रसार वाढत आहे. वडगाव जंगल पोलीस ठाण्याअंतर्गत सायखेडा व अकोला बाजार या गावात कोरोनाचे रूग्ण आढळुन आले आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणुन नागरिकांनी पोळा सण साध्या घरगुती पध्दतीने साजरा करण्याचे आवाहन ठाणेदार नरेश रणधीर यांनी केले आहे. कोणीही सार्वजनिक ठिकाणी पोळा भरवु नये व गर्दी होऊ नये याची दक्षता घ्यावी. आपआपल्या घरी बैलाची सजावट करून घरीच बैलाची पुजा करीत पोळा सण साजरा करावा . कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कोठेही पोळा भरवु नये. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा करू नये. एक गाव एक गणपती करीता नागरिकांनी प्रयत्न करावे , स्थानिक ग्रामपंचायत व पोलीस विभागाची परवानगी घेउनच श्रीगणेशाची स्थापना करावी , गणेशोत्सवात कोणतेही सामाजिक, सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करू नये तसेच श्रीगणेश स्थापना व विसर्जन मिरवणुक काढु नये .कोरोना संबंधात शासनाने दिलेल्या आदेशाचे व लाॅकडाउन नियमाचे पालन करावे , नियमाचे उल्लंघन केल्यास सबंधितावर कडक कायदेशीर कारवा ई करण्यात येईल. पोळा सण व गणेशोत्सव साजरा करतांना नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन ठाणेदार नरेश रणधीर यांनी केले आहे.
कोरोना टाळा कोरोना टाळा
यंदा घरीच साजरा करूया पोळा

Previous articleसर्जा- राजाच्या बैलपोळा सणावर कायद्याचा दंडुका
Next article
editor
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.