Home मराठवाडा सर्जा- राजाच्या बैलपोळा सणावर कायद्याचा दंडुका

सर्जा- राजाच्या बैलपोळा सणावर कायद्याचा दंडुका

62
0

सार्वजनिकरित्या बैलपोळा साजरा न करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे फर्मान..

लक्ष्मण बिलोरे – घनसावंगी

मराठवाडा विभागातील जालना जिल्ह्याच्या नागरी आणि ग्रामीण भागात कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून बाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तिंना कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेता आगामी काळात नागरिकाच्या सुरक्षेसाठी मंगळवारी, १८ आॅगष्ट रोजी साजरा होणारा बैलपोळा हा उत्सव सार्वजनिकरित्या साजरा न करण्याचे आवाहन जालना जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केले आहे.
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा लागू आहे. राज्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत आहे, त्यावर नियंत्रण आणण्यासाठी, शासनाने सुधारित अधिसूचना निर्गमित केली आहे. जालना जिल्ह्यात नागरी आणि ग्रामीण भागात कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून बाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तिंना कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेता आगामी काळात १८ आॅगष्ट २०२० मंगळवार रोजी साजरा होणारा बैलपोळा हा उत्सव सार्वजनिकरित्या साजरा न करण्याचे आवाहन जालना जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केले आहे. त्यानुसार बैलपोळ्याच्या दिवशी बैलांची सार्वजनिक मिरवणूक तसेच बैलांना एकत्रितपणे मंदिरासमोर आणण्यास प्रतिबिंब करण्यात येत आहे. बैलपोळा हा सण शेतकऱ्यांनी आपापल्या घरातच, किंवा शेत, घराच्या परिसरात साजरा करावा असे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, संस्था अथवा समुहावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. आपत्ती व्यवस्थापन २००५ चे कलम ५१ तसेच भारतीय दंडसहिता १८६० चे कलम १८८ नुसार अपराधी समजले जाईल. त्यानुसार कार्यवाही करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी यांनी पोलिसांना दिले आहेत. कोरोना महामारीचे गांभीर्य वाढल्याने प्रशासनाच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बैलपोळा सणावर कायद्याचा दंडुका उगारल्याने बैलपोळ्याच्या सणावर विरजण पडण्याची शक्यता आहे.

Unlimited Reseller Hosting