Home मराठवाडा प्रा. नितीन जैस्वाल व श्री विश्वंभर भांदरगे यांनी कोरले बुक ऑफ वर्ल्ड...

प्रा. नितीन जैस्वाल व श्री विश्वंभर भांदरगे यांनी कोरले बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आपले नाव

267

जालना प्रतिनिधी : 15 ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्य दिन आणि इंडियन रनिंग डे’चे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठ्या तृतीय सायरन्स वर्च्युअल रन ज्यामध्ये जगभरातील 74 हजार पेक्षा अधिक धावाकांनी सहभाग घेतला होता. 

पोलीस मित्र परिवार समन्वय समितीचे जालना जिल्हाध्यक्ष प्रा. नितीन जैस्वाल आणि कार्याध्यक्ष श्री विश्वंभर भांदरगे यांनी सायरन्सचे युनिटी ॲम्बेसेडर डॉ. कैलास सचदेव व सिटी ब्रँड अँबेसेडर श्री नितीन सचदेव यांच्यासोबत या वर्च्युअल रन मध्ये मध्ये सहभाग घेतला होता.
या स्पर्धेचे नोंद बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड युनायटेड किंग्डम मध्ये करण्यात आली आहे.
या स्पर्धेमध्ये जालन्यातील अनेक नामवंत डॉक्टर, व्यापारी व विधी सल्लागार सह तरुण, तरुणींनी उत्साहाने सहभाग घेतला होता.