Home बुलडाणा
337

शिवसंग्राम कडून कर्नाटक सरकारचा निषेध
कर्नाटकचे मुख्यमंत्री येदयुरप्पा यांचा पुतळ्याचे दहन
प्रतिनिधी(रवि आण्णा जाधव)
देऊळगाव राजा :- कर्नाटक राज्यतील बेळगावमधील मानगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कर्नाटक सरकारने हटवून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला.त्या निषधार्थ देऊळगाव राजा येथे आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोर शिवसंग्राम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कर्नाटक चे मुख्यमंत्री बी.एस.येदयुरप्पा यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून कर्नाटक सरकारचा निषेध केला.

कर्नाटक मधील बेळगाव जिल्हातील मानगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक रातोरात हटविण्यात आले.या प्रकरणाचा जहीर निषेध करत शिवसंग्राम संघटनेच्या वतीने कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येदयुरप्पा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी शिवसंग्राम संघटनेचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे,तालुका संघटक जहीर पठाण,अजमत पठाण,संजय हिवाळे,संतोष हिवाळे,अयाज पठाण आदी शिवसंग्राम संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.आंदोलन दरम्यान शिवसंग्राम संघटनेच्या वतीने “छत्रपती शिवाय पर्याय नाही,कर्नाटक सरकारचे नाटक चालणार नाही” अशी जोरदार घोषणाबाजी कर्नाटक सरकारच्या विरोधात करण्यात आली.छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवून करोडो शिव भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत.त्यामुळे कर्नाटक सरकारचा जहीर निषेध करून पुनश्च त्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी शिवसंग्राम संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.