Home मराठवाडा अखिल वारकरी संघाच्या जालना जिल्हा कोषाध्यक्षपदी विष्णू महाराज आनंदे यांची नियुक्ती

अखिल वारकरी संघाच्या जालना जिल्हा कोषाध्यक्षपदी विष्णू महाराज आनंदे यांची नियुक्ती

198

लक्ष्मण बिलोरे- घनसावंगी

१४ आॅगष्ट २०२० रोजी आळंदी येथे अखिल वारकरी संघाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली. यावेळी अखिल वारकरी संघ जालना जिल्हाकोषाध्यक्ष पदी महाराष्ट्रातील प्रसिद्ध किर्तनकार व भागवताचार्य श्री हभप विष्णु महाराज आनंदे मासेगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याच बरोबर जिल्ह्यातील नामवंत किर्तनकारांचाही या कार्यकारिणीत समावेश करण्यात आला.
जालना जिल्हा उपाध्यक्ष श्री हभप. गणेश म.जाधव परतुरकर, जिल्हाकार्याध्यक्ष श्री हभप वेदांताचार्य गणेश म कोल्हे, जिल्हासचिव श्री सचिनभैया शेरे, जिल्हासंघटक श्री हभप उद्धव म घनघाव (डोंगरगाव संस्थांचे नियोजक)
जिल्हा खजिनदार श्री विनोद पाटील सोळुंके गोंदीकर, जिल्हाप्रशिदिप्रमुख श्री भगवान साबळे (पत्रकार) या सर्व नामवंतांची नियुक्ती ,
राष्ट्रीय अध्यक्ष श्री हभप मच्छिंद्र म धानेपकर, उपाध्यक्ष श्री हभप गोविंद म गोरे
संघटक श्री हभप पांडुरंग म शास्त्री शितोळे
सचिव श्री हभप संजय म हिवराळे व सर्व राष्ट्रीय पदाधिकारी तसेच मराठवाडा अध्यक्ष श्री हभप निरंजन महाराज कार्याध्यक्ष श्री हभप सतिश म शास्त्री जाधव व जालना जिल्हाध्यक्ष श्री हभप निवृती महाराज लकडे यांनी सर्वांच्या नियुक्त्या करुन अभिनंदन केले.