Home महत्वाची बातमी कर्तव्यदक्ष ठाणेदारांसह पोलीस कर्मचाऱ्यांचा चिखली वासीयांच्या वतीने सत्कार

कर्तव्यदक्ष ठाणेदारांसह पोलीस कर्मचाऱ्यांचा चिखली वासीयांच्या वतीने सत्कार

579

 

नराधमांना फाशीची शिक्षा ,

प्रा , तंजिम हुसेन
चिखली येथे गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात एका 9 वर्षीय चिमुरडीला 2 नराधमांनी झोपेतून उचलून नेऊन तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला होता,या बलात्कार्‍यांच्या विरोधात चिखली पोलिसांनी खटला दाखल करून आरोपींविरोधात जलदगतीने पुरावे जमा केले होते, त्यामुळे दोन्ही आरोपींना विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश चित्रा हंकारे यांनी 13 ऑगस्ट रोजी फाशीची शिक्षा सुनावली. बलात्कारी नराधमांना न्यायालयाने दिलेली फाशीची शिक्षा पीडितेला न्याय देणारी असून पोस्को कायद्यांतर्गत ही पहिली फाशीची शिक्षा असून या निर्णयाचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे.
मागील वर्षी चिखली शहरात आरोपी सागर बोरकर आणि निखील गोलाईत यांनी 26 एप्रिल 2019 च्या मध्यरात्री एका 9 वर्षीय चिमुरडीवर अत्यंत क्रूरपणे बलात्कार केला होता. चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार गुलाबराव वाघ यांनी आरोपींविरुद्ध कलम 366 अ, 376 डी.बी. बाल लैंगिक अत्याचार कायदा 6 (पॉस्को) अंतर्गत खटला दाखल करून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली होती.
केंद्रीय मंत्रिमंडळाने 2012 मध्ये मंजुरी दिलेल्या पॉस्को कायद्याच्या अंतर्गत 12 वर्षांपर्यंतच्या बालकांवर बलात्कार केल्याबद्दल दोषी ठरलेल्यांना फाशीची शिक्षा दिली जाईल. पॉस्को कायद्यान्वये राज्यातील ही पीडित जिवीत असतांनाची आरोपींना झालेली फाशीची शिक्षा ही पहिलीच असावी, चिखली पोलिसांच्या कर्तव्यनिष्ठ कामगिरीवर राज्य पातळीवर शिक्कामोर्तब झाला आहे,तरी सर्वत्र चिखली पोलिसांचे कौतूक होत असून दि १४ ऑगस्ट चिखली पोलिस स्टेशन येथे सत्कारमूर्ती ठाणेदार वाघ साहेब
, शरद गिरी, काकड साहेब यांच्या सह इतर पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार शिवसेना तालुका प्रमुख कपिल खेडेकर,रयत क्रांती संघटनेचे प्रशांत ढोरे पाटील,विनायक सरनाईक,नगरसेवक दत्ता सुसर ,उडान फाउंडेशन चे अध्यक्ष इम्रान शेख स्वाभिमानी चे नितीन राजपूत, श्रीकांत टेहरे व विजय लोखंडे, राजेश कुलकर्णी, इम्रान नजर रईस बागवान, रासप चे भरत जोगदंडे, दीपक वाघ ,किशोर नवले ,शैलेश गावकर ,मोहन गवई, मंगेश ठेंग आदींनी सत्कार केला.