Home नांदेड लोहा कोविड सेंटर ला जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांची भेट

लोहा कोविड सेंटर ला जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांची भेट

209

मजहर शेख, नांदेड

सोयी सुविधेचा घेतला आढावा रुग्णांची केली विचारपूस

नांदेड / लोहा , दि. १५ :- आरोग्य अधिकारी कर्मचाऱ्यांचा अनुशेष लवकरच पूर्ण करू
लोहा तालुका प्रतिनिधी देश आणि राज्यात कोरोनाचे संकट निर्माण झाले आहे कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे रुग्णांना सर्व आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात मोजक्याच ठिकाणी कोविड सेंटर उभे करण्यात आले या सेंटर मध्ये रुग्णांना सर्व सुविधा शासनाकडून दिल्या जातात त्या सुविधा लोहा येथील कोविड सेंटर येथील रुग्णांना मिळतात की नाही याची पहाणी करण्यासाठी नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी शुक्रवारी दुपारी अचानक कोविड सेंटर ला भेट देऊन आरोग्य सुविधा रुग्णाची विचारपूस केली यावेळी पत्रकारांनी कोविड सेंटर मध्ये स्वछता नाही रुग्णाची गैरसोय होत आहे असा प्रश्न उपस्थित केला यावर जिल्हाधिकारी म्हणाले की अधिकारी आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता आहे ती लवकरच भरून काढू रुग्णांना जेवण पोटभर आणि चांगल्या दर्जाचे मिळत आहे आरोग्य सेवा पण चांगली आहे रुग्ण आरोग्य सेवेवर समाधानी आहेत त्यांच्याशी संवाद साधला आहे असे उत्तर दिले.
कोविड सेंटर मध्ये रुग्णांना योग्य उपचार आणि सर्व आरोग्यच्या सुविधा उपलब्ध आहेत यापुढे काही कमतरता असेल ते पण पूर्ण करून रुग्णांना सेवा देऊ व्हेलीटेंडर उपलब्ध असून त्यांची आवश्यकता सध्या नाही या कोविड सेंटर मध्ये कोरोना रुग्णांवर प्रथम उपचार केला जात आहे रुग्णाची प्रकृती चिंताजनक असेल तर रुग्ण उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात येत आहेत.
कोरोनाचा प्रारदुर्भाव टाळण्यासाठी जनतेनी शासनाच्या आदेशाचे पालन करावे गर्दी करू नये सोशल डिस्टन्स ठेवावा सानिटायझर चा वापर करावा आदी सूचना दिल्या महसुल आरोग्य आणि पोलीस प्रशासन आपापली जबाबदारी पार पाडत आहे कोविड सेंटर मध्ये सर्व सुविधा उपलब्ध असून रुग्णांनी व नातेवाईकांनी काळजी करू नये कोविड सेंटर चे जेवण दर्जेदार असून ते नको असेल तर नातेवाईक घरून डबा रुग्णांना देऊ शकतात असे जिल्हाधिकारी म्हणाले
यावेळी या भागाचे आमदार माजी सनदी अधिकारी शामसुंदर शिंदे यांच्या सुविद्या पत्नी सामाजिक कार्यकर्त्या सौ आशाताई शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वैदयकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना पी पी किट आणि सानिटायझर चे वाटप करण्यात आले यावेळी आमदार शामसूदर शिंदे सौ आशाताई शिंदे तहसीलदार विठलं परळीकर नायब तहसिलदार राम बोरगावकर प्रभारी मुख्याधिकारी अशोक मोकले तालुका आरोग्य अधिकारी डाँ मुंढे वैदयकीय अधीक्षक डाँ प्रशांत जाधव डाँ गणेश चव्हाण डाँ मोटे जी प सदस्य चंद्रसेन पाटील पोलीस निरीक्षक भागवत जायभाये नगरसेवक बालाजी खिल्लारे शाम पवार नगरसेवक जीवन चव्हाण बाबुराव डोम सिधु वडजे यांच्या सह अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.