Home विदर्भ महिला बचत गटांनी ट्रॅक्टर योजनेच्या माध्यमातून आर्थिक प्रगती साधावी – रामदास तडस

महिला बचत गटांनी ट्रॅक्टर योजनेच्या माध्यमातून आर्थिक प्रगती साधावी – रामदास तडस

376

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा , दि. 13 – ग्रामीण भागातील महिला बचत गटांना आर्थिक समृध्दीचे साधन मिळावे व गटातील महिलांचे आर्थिक उत्पन्न वाढावे यासाठी केंद्र व राज्य शासनाचे वतीने विविध योजना राबविण्यात येतआहे.

यामध्ये अनुसुचित जातीच्या महिला बचत गटासाठी मिनी ट्रॅक्टर योजना राबविली जात असून या योजनेचा बचत गटांनी लाभ घेऊन आर्थिक उन्नती साधावी असे आवाहन खासदार रामदास तडस यांनी आज सामाजिक न्याय भवन येथे मिनी ट्रॅक्टर योजने अंतर्गत वाटप करण्याकरीता आयोजित कार्यक्रमात केले.

यावेळी कार्यक्रमाला समाज कल्याण सहायक आयुक्त अनिल वाळके, उपायुक्त सुरेंद्र पवार, समाज कल्याण सभापती विजय आगलावे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास काबंळे, माविमच्या जिल्हा समन्वयक संगिता भोंगाडे, इस्कॉट कंपनीचे आश्विन सबनानी , विवेक हरने, भोयर ॲग्रो इंडस्ट्रिजचे संचालक सुरेश भोयर यांची उपस्थिती होती.

ग्रामीण भागातील रस्ता बांधकाम घरकुल बांधकामासाठी लागणा-या साहित्याची वाहतुक करण्यासाठी महिला बचत गटांना वितरीत करण्यात आलेल्या ट्रॅक्टरचा वापर करण्यासाठी कत्राटदारांना बंधनकारक करावे असेही श्री तडस म्हणाले.

सन 2019-20 मध्ये मिनी ट्रॅक्टर योजने अंतर्गत जिल्हयातील एकुण 40 महिला स्वयंसहायत बचत गटांना मिनी ट्रॅक्टर मंजूर करण्यात आले यापैकी 26 जानेवारी ला 20 बचत गटांना तर आज खासदार रामदास तडस यांचे हस्ते प्रबुध्द स्वयंसहायता बचत गट, पिपरा, रमाबाई स्वयंसहायता बचत गट लाडेगाव, आम्रपाली महिला बचत गट लाडेगाव, संविधान स्वयंसहायता बचत गट चोंदी, प्रेरणा महिला बचत गट कारंजा, सम्यक स्वयंसहायता बचत गट सोरटा, संविधान महिला बचत गट तळेगाव(शा.पं), पंचशिल महिला बचत गट अल्लीपूर, भिमाई महिला बचत गट सोरटा, सिंध्दात महिला बचत गट तळेगाव, उत्कर्ष महिला बचत गट चिंचोली, संबोधी महिला बचत गट भिडी, पंचशिल महिला बचत गट मदनी दिंदोडा, पंचशिल महिला बचत गट दहेगाव गो. अशा 14 महिला बचत गटांना मिनी ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन प्रेमलता बुरंगे यांनी तर आभार सोनाली पाळेकर यांनी मानले कार्यक्रमाला अनामिका बाराहाते, स्वाती कापसे, श्री. लिहितकर, श्री.लिंगलवार, श्री. टोनपे, किरण बोरकुटे, श्रीमती रेवतकर, मनोज पाटील, महिला बचत गटाच्या महिला, सामाजिक न्याय विभागाचे कर्मचारी मोठया प्रमाणात उपस्थित होते.