जळगाव

सोशल डिस्‍टन्‍सींगचे पालन करणे, मास्‍क न वापरणे इ.कारणांसाठी मुख्‍याधिकारी यांची दंडात्‍मक धडक कार्यवाही

Advertisements
Advertisements

निखिल मोर

पाचोरा – सार्वजनीक आरोग्‍य विभाग मंत्रालय मुंबई यांचेकडील अधिसुचना कोरोना/2020/प्र.क्र.58/आरोग्‍य-5 दि.14/03/2020 नूसार जिल्‍हयात कोव्‍हीड 19 चा संसर्ग रोखण्‍यासाठी राज्‍यात साथरोग प्रतिबंधक कायदा 1987 आणि आपत्‍ती व्‍यवस्‍थापन कायदा 2005 लागू करण्‍यात आलेला आहे.

त्‍या अनुषंगाने म.जिल्‍हाधिकारी सो. जळगांव यांनी घेतलेल्‍या व्हिडीओ कॉन्‍फरन्‍सींग मध्‍ये दिलेल्‍या आदेशानूसार तसेच म.उपविभागीय अधिकारी सो. पाचोरा भाग पाचोरा यांच्‍या दिलेल्‍या सुचनेप्रमाणे पाचोरा शहरात वेळोवेळी अनाऊन्‍सींगद्वारे, जाहिर सुचनेद्वारे तसेच नगरपरिषदेच्‍या अधिकारी / कर्मचारी यांनी शहरात सुचना देऊन देखील 1) चेह-यावर मास्‍क न लावणे, 2) सोशल डिस्‍टन्‍सींगचे पालन न करणे, 3) गर्दी टाळणे, 4) सार्वजनीक ठिकाणी थुंकणे व इतर तरतूदींचा भंग केल्‍या प्रकरणी दिनांक 11/08/2020 रोजी मुख्‍याधिकारी यांनी स्‍वतः रस्‍त्‍यावर उतरत नगरपरिषद कर्मचा-यांसह धडक दंडात्‍मक कार्यवाही करत तब्‍बल 26600/- मात्र दंड वसूल करण्‍यात आला तसेच शहरातील काही दुकानांवर मास्‍क न लावणे व सोशल डिस्‍टन्‍सींगचे पालन न करणे या पोटी 6 दुकानदारांवर आपत्‍ती व्‍यवस्‍थापन कायदा 2005, साथरोग प्रतिबंधात्‍मक कायदा, 1897 चे उल्‍लंघन म्‍हणून भा.द.वि.कलम 188 नूसार गुन्‍हा दाखल करण्‍याची कार्यवाही सुरु आहे.
सदर धडक मोहीमेचे नेतृत्‍व मुख्‍याधिकारी शोभा बाविस्‍कर यांनी केले पथकामध्‍ये प्रशासकिय अधिकारी प्रकाश भोसले, कर निरीक्षक दगडू मराठे, मधुकर सुर्यवंशी, साईदास जाधव, शाम ढवळे, विजेंद्र निकम, भागवत पाटील, महेंद्र गायकवाड, गजानन पाटील, आकाश खैरनार, किशोर मराठे, भिकन गायकवाड, युवराज जगताप, विलास कुलकर्णी, राकेश फतरोड, वाल्मिक गायकवाड, गोविंद पारोचे, आकाश खेडकर, संजय जगताप, सचिन कंडारे, सरजु बाबु डागोर, किरण ब्राम्‍हणे, भास्‍कर पवार, अनिल बागुल संजय वाकडे, सुभाष बागुल, युसुफ पठाण आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
नागरीकांनी शासनाने दिलेल्‍या आदेशाचे पालन न केल्‍यास नगरपरिषदेकडून मोहीम अधिक तिव्र करण्‍यात येईल व यापुढे देखील अशीच धडक दंडात्‍मक कार्यवाही करण्‍यात येईल असे मुख्‍याधिकारी शोभा बाविस्‍कर सांगीतले.

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

जळगाव

कोविड रुग्णांची अशीही सेवा देणारे योध्दा डॉक्टर – कोविड केअर युनिट तर्फे गौरव – डॉ पराग चौधरी व डॉ पंकज पाटील

रावेर (शरीफ शेख)  जळगाव – शहरातील कोविंड रुग्णांची संख्या वाढत आहे सरकारी रुग्णालय त्यासाठी कमी ...
जळगाव

दहिवद येथे जपानची मियावाकी पध्दतीने वृक्ष लागवडीचा प्रयोग..ग्रामपंचायतीमार्फत १००० देशी वृक्षांची लागवड

अमळनेर –  जपान या देशात मियावाकी पध्दतीमध्ये कमीत कमी जागेत जास्तीत जास्त वृक्ष लागवड केली ...
जळगाव

ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन च्या महिला जिल्हाउपाध्यक्ष पदी प्रा जयश्री दाभाडे साळुंके यांची निवड…

रावेर (शरीफ शेख)  ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन केंद्रिय कार्यालय प्लॉट नं.३५. गोंडवाना नगर क्र.०२, ...
जळगाव

अमळनेर तालुक्यात सततच्या वादळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान… मागील वर्षीप्रमाणे यंदाही अतिवृष्टीने तोंडावर आलेला घास जाणार

रजनीकांत पाटील अमळनेर :- यंदा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला असून नदी नाले तलाव तुडुंब ...