Home महत्वाची बातमी धक्कादायक,कोविड केअर सेंटर मधील जेवणात निघाल्याआळ्या

धक्कादायक,कोविड केअर सेंटर मधील जेवणात निघाल्याआळ्या

150

सलमान मुल्ला ,

उस्मानाबाद ,

कळंब शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील व भुम, परंडा, वाशी सह कोरोना बाधित रुग्णांना कळंब च्या तांदुळवाडी रोडवर औद्योगिक प्रशिक्षण संस्था या केंद्रात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत.

त्यांच्यावर उपचार चालु असुन या रुग्णांना देण्यात येणाऱ्या आहारात निक्रष्ट दर्जाचे अन्न दिले जात असल्याचा आरोप कळंब शिवसेना तालुका प्रमुख शिवाजी अप्पा कापसे व उत्कर्ष फाउंडेशन च्या अध्यक्ष उज्जवला अंगरखे यांनी याआधी केली होती.

मात्र तेथील उपचार घेत असलेल्या रुग्णांकडुन त्या आहारातील निकृष्ट दर्जाचे भाज्यांचे सोशल मिडिया वर व्हायरल झाल्या आहेत.

याविषयी कळंब उपजिल्हा रुग्णालयाचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ जिवन वायदंडे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी कोविड केअर सेंटरमध्ये जे जेवण येते ते आम्हीही घेतो त्यामध्ये कुढलीही हयगय झालेली नाही आणि जो व्हायरल व्हिडिओ किंवा फोटो आहे त्यामध्ये एक किडा आढळला आहे तो किडा जेवण करताना जिवन्त होता त्यामुळे जेवण निकृष्ट दर्जाचे आहे असे म्हणता येणार नाही असे त्यांनी सांगितले..

दरम्यान उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांच्यासह कळंबचे प्र. तहसीलदार असलम जमादार यांनी याबाबत पाहणी केली असून संबंधितावर कार्यवाही करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.