महाराष्ट्र

अल्पवयीन भाचीला मावशीनेच दाखवली अश्लील क्लिप व केला शारीरिक अत्याचार ,

Advertisements
Advertisements

मावशी सह तिच्या परीयकरास अटक ,

अमीन शाह

पुणे ,

लॉकडाउन काळात आपल्या अल्पवयीन भाचीला तिच्या इच्छेविरोधात अश्लील चित्रफीत दाखवून शोषण करणाऱ्या मावशीला व तिच्या प्रियकराला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. एप्रिल महिन्यात हा प्रकार घडल्याचं समोर येतंय. धीर एकवटत पीडित मुलीने आपल्या आईला याबद्दल माहिती देताच…आईने कोंढवा पोलीस ठाण्यात आपली बहिण आणि तिच्या प्रियकराविरोधात तक्रार दाखल केली आहे. पुणे पोलिसांनीही या प्रकरणात पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करुन मावशी व तिच्या प्रियकराला अटक केली आहे.

एप्रिल महिन्यात लॉकडाउन सुरु असताना पीडित मुलीची आई आपल्या ४ मुलांना बहिणीकडे सोडायची. याचदरम्यान मावशीचा प्रियकर तिला भेटण्यासाठी घरी यायचा. मुलीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार मावशी व तिचा प्रियकर इच्छेविरोधात मुलीला अश्लील चित्रफीत दाखवत होते. मुलीने इतके महिने याप्रकरणी वाच्यता केली नाही. परंतू अखेरीस धीर एकवटत तिने आपल्या आईला घडलेल्या प्रकाराबद्दल माहिती दिल्याचं कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी सांगितलं.
दोन्ही आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांची करोना चाचणी केली आहे. दोन्ही आरोपींचा करोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. गंभीर गुन्हा असल्यामुळे न्यायालयानेही आरोपींना कोठडीत टाकण्याची परवानगी दिली आहे. परंतू करोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यामुळे जेल प्रशासन आरोपींना दाखल करुन घेत नाहीये. दोन्ही आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे. सध्या या आरोपींवर ससून रुग्णालयात उपचार सुरु असून उपचार झाल्यानंतर पुढील कारवाईबद्दल ठरवलं जाईल असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

महाराष्ट्र

अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हा सेक्रेटरी पदावर प्रा शिवाजी काटे यांची निवड

  निजाम पटेल , अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी , अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यकरणीस प्रांताध्यक्ष नामदार ...
महाराष्ट्र

जीवन गौरवचा अनोखा ऑनलाईन मुख्याध्यापक,शिक्षक गुणगौरव सोहळा संपन्न…!

ठाणे – प्रतिनिधी जीवन गौरव सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, क्रीडा क्षेत्राला वाहिलेले मासिक मार्फत आयोजित ऑनलाईन ...
महाराष्ट्र

शहरी व ग्रामीण पत्रकारांना ५० लाखांचे विमा कवच देण्याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा – विनोद पञे

पञकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्रात कोरोना काळात आरोग्य आणि पोलिस कर्मचाऱ्यांना 50 लाखाच्या विमाकवच ...