मराठवाडा

लहान बाळा समोरच तिने का केले विष प्राशन , ???

Advertisements
Advertisements

दुःखद घटना ,

अमीन शाह

औरंंगाबाद : पतीच्या दारूच्या व्यसनाला कंटाळून १४ महिन्याच्या मुलीच्या समोर आईने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद तालुक्यातील वाहेगाव येथे घडली.या प्रकरणी करमाड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दुर्गा लक्ष्मण शिंदे (वय २२,रा.वाहेगाव, ता.औरंगाबाद) असे मृत विवाहितेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्गा हिचे लक्ष्मन शिंदे यांच्या सोबत लग्न झाले होते.त्यांना एक १४ महिन्याची मुलगी आहे. लक्ष्मण ला दारूचे व्यसन आहे.अनेकवेळा सांगून देखील तो दारूचे व्यसन काही कमी करीत नसे रोज मित्रांना घेऊन तो पार्टीचा बेत आखत असे तर रात्री बे रात्री तो घरी येत असे.या सर्व प्रकाराला दुर्गा प्रचंड वैतागली होती.दुर्गा ही अत्यन्त शांत स्वभावाची होती, अनेक वेळा पती-पत्नी मध्ये किरकोळ वाद होत असे. लक्ष्मण चा डीजे साउंड सिस्टीम चा व्यवसाय आहे त्या कडे दोन डीजे सिस्टीम आहे मात्र मागील चार महिन्यापासून लॉक डाऊन असल्याने तो आर्थिक अडचणीत आला होता,त्यामुळे माहेरच्या मंडळींनी त्यास आर्थिक मदत, सोने देखील दिले होते. आर्थिक चणचण जाणवल्यास घराचा गाडा चालविण्यासाठी बँकेचा एक कोरा चेक देखील दिला होता. सासरच्या मंडळी कडून आर्थिक मदत मिळाल्या नंतर त्याने दुसरा व्यवसाय सुरू करावा अशी सर्वांची इच्छा होती मात्र तसे न करता तो अधिकच दारूच्या व्यसनाच्या आहारी गेला होता.रोजच्या दारू पाट्र्याळे दुर्गा वैतागली होती. संध्याकाळी साडेपाच वाजता पती-पत्नी मध्ये बोलणे झाले.व तुम्ही घरी या मी आत्महत्या करते असे दुर्गाने सांगितले त्यावरून लक्ष्मण धावत घरी आला.मात्र तो पर्यंत दुर्गाने घराच्या दुस?्या मजल्यावर विष प्राशन केले होते.तिला बेशुद्ध अवस्थेत घाटी रुग्णालयात उपचार कामी हलविण्यात आले.मात्र तिथे वैधकीय अधिकारयांनी तपासून दुर्गाला मृत घोषित केले.अशी माहिती नातेवाईकांनी करमाड पोलिसा समोर घाटी रुग्णालयात पत्रकारांना माहिती दिली. या प्रकरणी सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास जमादार जी. एस.भताने हे करीत आहेत

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

मराठवाडा

पुरग्रस्तांच्या अन्नधान्य आणि निवाऱ्याची पुर्व व्यवस्था प्रशासन कधी करणार..???

गोदामायने केले रौद्ररूप धारण,२००६ची पुनरावृत्ती होण्याची शक्यता…! घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे पैठण – येथील जायकवाडी ...
मराठवाडा

….हा तर राज्य सरकारने मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे.

पोलिस मेगाभरती घोषणेच्या पार्श्वभुमीवर मराठा समाजातील तरूणांच्या संतप्त प्रतिक्रिया…!   घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे कुंभार ...
मराठवाडा

अंबड येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन करण्यास मान्यता – पालकमंत्री राजेश टोपे

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे  पोलिसवाला ऑनलाईन मिडिया जालना –  जिल्ह्यातील अंबड येथे जिल्हा व अतिरिक्त ...