महत्वाची बातमी

अल्पवयीन मुलीच्या अपहरण हत्या व अत्याचार प्रकरणी पोस्को 4 व खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा

Advertisements
Advertisements

,

– चौकशी अधिकारी राऊत यांना निवेदन

जलगाँव: एजाज़ गुलाब शाह
दि.८अगस्त२०२०

१९ जुलै रोजी तांबापुर येथील अल्पवयीन मुलगी मुस्कान शाह हिला येथीलच विशाल भोई याने फूस लावून पळवून नेले होते व दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह मेहरूण तलावात आढळून आला होता या प्रकरणी रामानंद नगर पोलिस स्टेशन येथे फूस लावून पळविले बद्दल गुन्हा नोंद केला त्या नंतर आत्महत्येस प्रवृत्त केल्या बाबत व पोस्को कलम १२ प्रमाणे विशाल भोई याच्यावर गुन्हा दाखल केला करण्यात आला होता
परंतु आज ८ऑगस्ट पर्यंत उत्तरीय तपासणी अहवाल प्राप्त न झाल्याने तसेच इतर कागदोपत्री पुरावा आढळून न आल्यामुळे भा द वि ३७६ व पोकसो कलम ४ हे कलम पोलिसांनी अद्याप लावले नाही एवढेच नव्हे तर भा द वि ३०२ प्रमाणे कारवाई करावी अशी मागणी मुस्कान ची आई सुफिया भिकन शाह यांनी चौकशी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक बी एस राऊत यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली.
चौकशी अधिकारी राऊत यांनी फिर्यादी सोबत आलेले सामाजिक कार्यकर्ते मानियार बिरादरीचे अध्यक्ष फारूक शेख ,शिकलगर बिरादरीचे अन्वर खान, शाह बिरादरीचे आसिफ शाह, अनिस शाह तांबापूर येथील समाज सेवक वसीम खान , लतीफ खान अजिज बाबा, मुख्तार शाह यांना समजावून सांगितले की उत्तरीय तपासणी अहवाल मध्ये आलेल्या पुराव्यावरून निश्चितच इतर कलम वाढवण्यात येतील.

पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर व चौकशी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राऊत साहेब यांनी सदर प्रकरणी योग्य रीतीने तपास सुरू असून आपल्या निवेदना ची सुद्धा आम्ही योग्य ती दखल घेऊ व मुस्कान शाह ला पूर्ण न्याय मिळवून देऊ असे आश्वासन शिष्ट मंडळास दिले
*या प्रकरणी आज १९ दिवस झाले तरी जळगाव मधील महिला संघटना इतर संघटनांनी मौन पत्करले आहे एकी कडे सुशांत सिह आत्महत्या प्रकरणी सी आय डी, सी बी आय मागणी साठी सर्व पक्ष ,संघटना व मीडिया लढत आहे परंतु या अल्पवयीन व झोपडपट्टीत राहणारी मुलगी मुस्कान साठी कोणीही आवाज काढत नसल्याची खंत फारूक शेख यांनी आपल्या व्यक्त केली आहे*

फोटो ,

चौकशी अधिकारी सपोनि राऊत यांना निवेदन देताना सुफीया शाह सोबत मयत चे वडील भिकन शाह, मयताचे मामा आसिफ शाह, फारुक शेख,अन्वर खान, अनिस शाह ,आसिफ शाह, मुक्तार शहा वसीम बापू ,अजित बाबा, मुक्तार शहा ,लतीफ खान आदि दिसत आहे

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

महत्वाची बातमी

पुराच्या पाण्यात अडकलेल्याना वाचवितांना एकाच दुर्देवी मृत्यू ,

पुराच्या पाण्यात अडकलेल्याना वाचवितांना एकाच दुर्देवी मृत्यू , अमीन शाह मेहकर तालुक्यातील दे , माळी ...
महत्वाची बातमी

पत्रकार सर्वांचा , मात्र संकट आल्यावर पत्रकारांचे कोण्ही नाही , पत्रकारांनो उघडा डोळे,नीट बघा –  “स्वतःकडे”

राम खुर्दळ पत्रकारांचे अनेक स्थर आहेत त्यातील बिनपगारी ( केवळ महिना से-दोनशे-पाचशे ) मानधनावर ,किंवा ...