Home विदर्भ यवतमाळ जिल्ह्यात 101 पॉझेटिव्ह रुग्णांची‌ देणगी

यवतमाळ जिल्ह्यात 101 पॉझेटिव्ह रुग्णांची‌ देणगी

179

तिघांचा मृत्यु ; 99 जणांना सुट्टी

यवतमाळ‌, दि. 8 : – जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत असून आज (दि. 8) यात नव्याने 101 पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली. तर तीन कोरोनाबाधित रुग्णांचा जिल्ह्यात मृत्यु झाला. तसेच आयसोलेशन वॉर्ड आणि विविध कोव्हीड सेंटरमध्ये भरती असलेले 99 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील चिंतामणी नगर, वाघापूर येथील 60 वर्षीय पुरुष, नेहरू चौक येथील 65 वर्षीय पुरुष आणि पुसद तालुक्यातील इसापूर येथील 78 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या 101 रुग्णांमध्ये 59 पुरुष व 42 महिलांचा समावेश आहे. यात पुसद शहरातील 14 पुरुष व 11 महिला, पुसद ग्रामीण भागातील दोन पुरुष व दोन महिला, पांढरकवडा शहरातील दोन पुरुष व दोन महिला, पांढरकवडा ग्रामीण भागातील तीन पुरुष व पाच महिला, घाटंजी तालुक्यातील एक महिला, महागाव तालुक्यातील दोन पुरुष, दिग्रस शहरातील आठ पुरुष व पाच महिला, यवतमाळ शहरातील अकरा पुरुष व पाच महिला, दारव्हा शहरातील एक महिला, उमरखेड शहरातील 14 पुरुष व पाच महिला, उमरखेड ग्रामीण भागातील दोन महिला, आर्णी शहरातील तीन पुरुष व दोन महिला, नेर तालुक्यातील एक महिलेचा समावेश आहे

जिल्ह्यात तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु आणि ‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ झालेल्या 99 जणांना सुट्टी झाल्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 336 आहे. सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 1491 झाली आहे. यापैकी 1114 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 41 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 119 जण भरती आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत 25445 नमुने पाठविले असून यापैकी 22458 प्राप्त तर 2987 अप्राप्त आहेत. तसेच 20967 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.