Home जळगाव खिर्डी बुद्रुक येथील काँक्रीटिकरण ची चौकशी करण्यास अधिकाऱ्यांनची टाळाटाळ.. कोणाचा आहे वरद...

खिर्डी बुद्रुक येथील काँक्रीटिकरण ची चौकशी करण्यास अधिकाऱ्यांनची टाळाटाळ.. कोणाचा आहे वरद हस्त या प्रकरणात ?

140

रावेर (शरीफ शेख)

रावेर तालुक्यातील खिर्डी बु.येथील 14 व्या वित्त आयोगा अंतर्गत झालेल्या निकृष्ठ काँक्रीटिकरण ची कामाची चौकशी मागणी दि.22 जून 20 रोजी गटविकास अधिकारी, तहसीलदार यांच्याकडे केली होती त्याचप्रमाणे त्याची प्रत मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगांव,मा.जिल्हाधिकारी कार्यालय जळगांव यांच्या कडे सुध्दा पाठवली आहे तरी 15 दिवस होऊन काही ठोस पावले न उचलल्यामुळे त्यांना दि.8.जुलै 20 रोजी एक स्मरण पत्र दिले परंतु परत 15 दिवस होऊन सुध्दा कुठलीच कार्यवाही न होत असल्यामुळे सदर 22 जुलै 20 ला प.समिती रावेर येथे जाऊन प्रत्यक्ष मा.गटविकास अधिकारी सौ.यांची भेट घेतली असता संबंधित सर्व प्रकरण ची माहिती दिली.तसेच आपल्या कार्यालयातुन सादर केलेले तक्रार अर्जाचे फोटो काढून किंवा प.समितीतून संबंधित व्यक्तीकडे प्रसारित होऊन तक्रारदार यांचा अपप्रचार व शिव्या, धमकी येत असल्या बाबत ची माहिती दिली.व त्यासंबंधी 23 जुलै 2020 रोजी वरिष्ठ अधिकारी यांच्या दप्तरातून कागदपत्रे अश्या पद्धतीने लीक व व्हायरल होत असतील तर वरिष्ठ अधिकारी यांच्यावरील विश्वासाला ही ठेस आहे.व अशी कागदपत्रे लीक व व्हायरल करणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचारी यांच्यावर कार्यवाही करावी.व संबंधित प्रकरणाची सायबर सेल मध्ये गुन्हा नोंदवावा अशी लेखी तक्रार सुध्दा मा.गटविकास अधिकारी सौ.मा.तहसीलदार सौ.यांच्याकडे केलेली आहे.तरी अधिकारी या बाबी कडे व सदर कामाची चौकशी करण्यास जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते विनायक जहुरे तथा तक्रारदार व्यक्त केला.