Home नांदेड कोरोनातून बरे झाल्याने आज चौघांना सुटी, किनवटमध्ये 2 बाधितांची भर

कोरोनातून बरे झाल्याने आज चौघांना सुटी, किनवटमध्ये 2 बाधितांची भर

114

मजहर शेख

नांदेड / किनवट , दि. 8 :- किनवटमध्ये शनिवारी (दि. 8) सकाळी 11 वाजता प्राप्त माहिती नुसार आरटीपीसीआर टेस्ट पद्धतीद्वारे केलेल्या तपासणीत 1 व रॅपिड ऍटिजेन टेस्ट द्वारे 1 असे 2 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आता बाधित रूग्णांची आजपर्यंतची एकूण संख्या 50 झाली आहे. कोरोनातून बरे झाल्याने आज 4 रुग्णांना सुटी दिली आहे, त्यामुळे बरे होऊन घरी गेलेले आजपर्यंतचे एकूण 11 जण झाले आहेत. बाधितांपैकी आज संदर्भित 2 व येथील कोविड केअर सेंटरमध्ये 32 रुग्ण उपचार घेत आहेत.
आज कोरोनातून मुक्त झाल्याने गोकुंदा येथून 1 व किनवट येथून 3 रुग्णांना सुटी देण्यात आली आहे .आज आलेल्या तपासणी अहवालात किनवटच्या गंगानगरमधील 49 वर्षाचा 1 पुरुष आणि वेलमापूरा येथील 60 वर्षाचा 1 पुरुष अशा 2 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळला आहे.
डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालय, गोकुंदा येथे 17 ( आरटीपीसीआर 9 + रॅपिड 8 ), कोविड केअर सेंटर, किनवट येथे 15 ( आरटीपीसीआर 7 + रॅपिड 8 ) अशा एकूण 32 रुग्णांवर औषधोपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. जनतेंनी घाबरू नये, शासनाच्या व आरोग्य विभागाच्या सूचना पाळाव्या, असे आवाहन वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम धुमाळे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी केले आहे.

किनवट तालुक्याची कोरोना विषयी संक्षिप्त माहिती पुढील प्रमाणे
दि. 08/08/2020 सकाळी 11.00 वाजता

आरटीपीसीआर टेस्ट
घेतलेले एकूण स्वॅब- 285,
निगेटिव्ह स्वॅब- 181,
आज आरटीपीसीआर स्वॅब पॉझिटिव्ह संख्या- 1
स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-22
स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 7,

ऍन्टिजेन टेस्ट
अॅन्टिजन टेस्ट – 22
निगेटिव्ह अहवाल – 21
आज रोजी पॉझिटीव्ह अहवाल – 1

आज रोजी एकुण पॉझिटीव्ह रुग्ण – 2
आज मृत्यू – 0
आतापर्यंतची एकूण मृत्यू संख्या- 1,
आतापर्यंतचे एकुण बाधित व्यक्ती- 50,
आज सुटी दिलेले – 4
रुग्णालयातून सुटी दिलेली एकूण संख्या- 11,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 32 + आज संदर्भित रुग्ण 2