महत्वाची बातमी

तीन दिवसात गुरे न मिळाल्यास आत्मदहन करणार

Advertisements
Advertisements

तीन दिवसात गुरे न मिळाल्यास आत्मदहन करणार

महेरून येथील शेतकऱ्यांचा इशारा ,

*बाफना गो सेवा केंद्र बद्दल तक्रार*

जलगाँव: एजाज़ गुलाब शाह

मेहरुण परिसरातील दत्तनगर, पिरजादे वाडा व मेहरून परिसरातील शेतकऱ्यांचे दिनांक २५ जुलै रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक विनायक लोकरे व त्यांच्यासह एकूण ३६ पोलीस अधिकारी, कर्मचारी व होमगार्ड यांनी सकाळी आठ ते नऊ वाजेच्या दरम्यान घरासमोर उभी असलेली तसेच मोकळ्या मैदानावर बांधलेली एकूण १४१ गुरे जप्त केली होती. तेव्हा ही याच्यातील काही शेतकऱ्यांनी आपली गुरेढोरे सोडून द्या अशी विनंती केली होती परंतु आपण पोलिस स्टेशनला येऊन आपली मालकी असल्याबद्दल सत्यता पटवून द्या व आपली गुरे घेऊन जा असे सांगितल्याने त्याच्यातील आठ शेतकऱ्यांनी ८२ आपली स्वतःची व शेतीकामाची असल्याबद्दल कागदोपत्री पुरावे पोलीस स्टेशनला जमा केल्यामुळे एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये दाखल प्रथम खबर क्रमांक ९९४/२०२० दिनांक २९-७-२० अन्वये त्या खबरीत स्पष्टपणे एमआयडीसी पोलीस स्टेशन यांनी ८२ गुरे ही मोहम्मद जाहिद,हिफजूर रहमान, मुजाहिद जहागीरदार ,शकील पिरजादे, इस्माईल शहा दगा शाह, मजीत मिया जहागीरदार ,मोहम्मद मुदस्सीर जहागीरदार व मोहम्मद वसीम फारुकी यांची असून त्यांनी त्यांचे शेतीचे पुरावे तसेच ते पारंपारिक शेतकरी असल्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला नसून त्याच्यातील ६० गुरांचे तीन मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे परंतु ८२ जनावरे परत करण्याबाबत एमआयडीसी पोलिसांनी शंभर रुपयांच्या स्टॅम्प वर २८-७-२० रोजी सुपूर्द नामा सुद्धा करून दिलेला आहे व त्यात स्पष्टपणे म्हटलेले आहे की *सदरची गुरे ही आपण आरसी बाफना गो सेवा केंद्र कुसुंबा तालुका जिल्हा जळगाव यांच्या कडे योग्य तो शुल्क भरून घेण्याची समज मिळाली आहे*

परंतु दिनांक २५ जुलै ते आज ७ ऑगस्ट पर्यंत सदरचे शेतकरी रोज एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे तसेच आरसी बाफना गो सेवा केंद्रावर जाऊन आपली जनावर घेण्यास जात आहे परंतु त्यांना तेथून परत करण्यात येत आहे.

सदर प्रकरणी या शेतकऱ्यांनी जळगावातील राजकीय पदाधिकारी हाजी गफ्फार मलीक, झिया बागवान, तसेच सामाजिक कार्य कर्ते फारूक शेख,इकबाल पिरजादे,अनिस शाह,मार्फत तसेच आमदार राजूमामा भोळे व पालक मंत्री गुलाबराव पाटील यांच्याही मार्फत पोलीस निरीक्षक एमआयडीसी, सहाय्यक पोलीस अधीक्षक जळगाव विभाग नीलाभ रोहन साहेब ,पोलीस अधीक्षक डॉक्टर पंजाबराव उगले यांना वेळोवेळी सदर बाब निदर्शनास आणली असून सुद्धा आज पर्यंत या आठ शेतकऱ्यांना आपली गुरे परत मिळत नसल्याने आज त्यांनी जिल्हा दंडाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे गेले असता ते माननीय मुख्यमंत्री सोबत व्ही सी मध्ये व्यस्त असल्याने त्यांनी आपले म्हणणे उपजिल्हाधिकारी (महसूल) रवींद्र भारदे साहेब यांच्यामार्फत मांडले असून *तीन दिवसात आम्हास आमची गुरे ताब्यात न मिळाल्यास आम्ही आत्मदहनाचा मार्ग स्वीकारू व त्यास सर्वस्वी आर सी बाफना गो सेवा केंद्र कुसुंबा हे जबाबदार राहतील असे लेखी निवेदन त्यांनी आज दिलेले आहे.*

निवेदन देताना त्यांच्या सोबत मानियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख, एम आय एम चे जिल्हाध्यक्ष झिया बागवान, एडवोकेट बी एस पिरजादे व एम आय एम चे उत्तर महाराष्ट्राचे युवा संघटनेचे सनेर सय्यद यांची उपस्थिती होती.

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

महत्वाची बातमी

पुराच्या पाण्यात अडकलेल्याना वाचवितांना एकाच दुर्देवी मृत्यू ,

पुराच्या पाण्यात अडकलेल्याना वाचवितांना एकाच दुर्देवी मृत्यू , अमीन शाह मेहकर तालुक्यातील दे , माळी ...
महत्वाची बातमी

पत्रकार सर्वांचा , मात्र संकट आल्यावर पत्रकारांचे कोण्ही नाही , पत्रकारांनो उघडा डोळे,नीट बघा –  “स्वतःकडे”

राम खुर्दळ पत्रकारांचे अनेक स्थर आहेत त्यातील बिनपगारी ( केवळ महिना से-दोनशे-पाचशे ) मानधनावर ,किंवा ...