Home विदर्भ शेतकऱ्यांना कर्जमाफी , पिककर्ज देण्यास बँकाची टाळाटाळ , खतांची “अ” उपलब्धता ,...

शेतकऱ्यांना कर्जमाफी , पिककर्ज देण्यास बँकाची टाळाटाळ , खतांची “अ” उपलब्धता , बोगस याणामुळे उद्भवलेले दुबार पेरणीचे गंभीर संकट – आम आदमी पार्टी

368

यवतमाळ – यावर्षी , पावसाने दमदार व वेळेवर सुरुवात केल्यामुळे बळीराजाच्या यंदाच्या खरीप हंगामाबाबत आशा पल्लवित झाल्या तथापि कोरोनाचे संकट घोंगावत असतानाच खरिप हंगामाची सुरवात झाली आहे .

शेतकऱ्यांच्या घरातील कापूस व तत्सम माल विकला गेला नसल्यामुळे खरिपासाठी बियाणे , खते व औषधे खरेदीसाठी शेतकऱ्याकड़े पैसे नाहीत , कोरोनामुळे शेतकर्यांती आर्थीक परिस्थिति संकटात सापडली असून भाजीपाला किंवा फळ पिकांना भाव नाहीत . कोरोनाच्या नावाखाली व्यापारी व दलाल यांनी शेतकरी पिळून काढला आहे . त्यामुळे शेतकऱ्यांचे खरीप हंगामाचे बजेट कोसळले आहे . मागील १० ते १२ वर्षात झालेल्या कर्जमाफीचा अनेक शेतकऱ्यांना आजवर लाभ मिळालेला नाही . काँग्रेस युती आणि आता आपल्या सरकारने कर्जमाफी केली आहे , परंतु अनेक शेतकऱ्यांना या तिन्ही कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही तर काही शेतकरी जुने कर्जदार आहेत तर काही शेतकरी २ लाखाच्या वरील कर्जदार आहेत , त्यांना आतापर्यंत लाभ मिळाला नाही . दुसरीकडे कर्जमाफी योजनेत लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यासंदर्भातील जमाखर्च न झाल्यामुळे शेतकरी नविन पिककर्ज शेतकऱ्यांच मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत . ‌यवतमाळ जिल्हातील शेतकर्यांना पिक कर्ज वेळेवर न मिळाल्यामुळे शेतकर्यांना खाजगी सावकारकडे गेल्याशिवाय पर्याय उरलेला नाही . त्यामुळे सरकारने खरिप हंगामासाठी कृषि विभागाकडून कर्ज देणे आवश्यक आहे . विशेष बाब अशी की , शेतकऱ्यांनी जे बियाणे महाबीज , कृषीधन ‌इत्यादी नामांकित कंपन्यांकडून खरेदी करुन पैरले ते रुजलंच नाही त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या गंभीर संकटाला सामोरे जावे लागले . अस्त्यातच आता कृषी केंद्रांवर रासायनिक खताचा विशेष‌ , युरिया‌चा तुटवडा आहे . त्यामुळे शेतकरी संकटात आला आहे . निसर्ग चक्रीवादळ कोकण किनारपट्टीला पडकल्याने रायगड , रत्नागिरी व सिंधुदुर्ग त्या तळकोकणातील जिल्ल्यांच्या किनारपट्टीला प्रचंड मोठ्या प्रमाणात आंबा , नारळ , सुपारीच्या बागांप्रमाणेच शेती , घर व गोठ्यांचे अतिशय नुकसान झाले आहे . त्यांनाही देण्यात येणारी मदत अपुरी आहे किंवा ज्यांचे नुकसान झाले त्यांना अजून पर्यंत नुकसान भरपाई मिळालेली नाही , या करिता आज आपणाकडे खालील मागण्याचे निवेदन‌ दिल‌े आहेत , याचा सकरात्मक विचार करून आपण शेतकर्यांच्या पाठीशी उभे राहावे असे निवेदन आम आदमी पार्टी यवतमाळ च्या वतीने जिल्हा प्रशासनाल‌ा दिले.

निवेदनातील मुद्दे….!

जुने कर्ज असलेल्या आणि २ लाखापेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकन्यांना आज पर्यंत एकदाही कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही , त्यांना तातडीने कर्जमाफी द्यावी .

सर्व शेतकन्यांना तात्काळ पिककर्ज मिळण्यासाठी राष्ट्रीयकृत तथा सहकारी बँकांना आदेश द्यावेत , ज्या बमा शेतक – यांना कर्ज देत नाहीत त्या मॅकावर कार्यवाही करण्याबाबत जिल्हाधिकार्याना सुचना देऊन पिकलर्ज देणार्या बँकावर त्वरीत फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत .

बाजारात मुबलक प्रमाणात युरिया सह इतर खतांची उपलब्धता करावी , टंगाई दाखवून जास्ती भावाने खत विक्रेत्यांवर कार्यवाही करावी . दुबार पेरणीचे संकट ओढवलेल्या शेतकन्यांना तात्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी .

निकृष्ठ बियाणे विकणाऱ्या कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत , निसर्ग वादळाने उध्वस्त झालेल्यांना घरांची दुरुस्ती व शेती करण्यासाठी तात्काळ किमान ५०० कोटीची गदत देवून प्रत्येक कुटुंबाला तात्काळ दोन लाख रुपये मदत करावी .