मराठवाडा

ग्रामीण भागात कोरोनाचा उद्रेक, महाकाळा सर्वाधिक 39 तर कुंभार पिंपळगावात आणखी 3 नवे रुग्ण आढळल्याने चिंता वाढली

Advertisements
Advertisements

लक्ष्मण बिलोरे – घनसावंगी

जालना – जिल्ह्यात आज शुक्रवारी सायंकाळी एकूण 84 संशयीत रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह प्राप्त झाले असून यामध्ये सुमारे 39 रुग्ण हे अंबड तालुक्यातील महाकाळा येथील असल्याने एकच खळबळ उडाली आहे. या 84 रूग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यातील एकुण कोरोना बाधीत रूग्णांची संख्या आता अँटीजन चाचणीसह 2739 इतकी झाली असून त्यापैकी 1718 रुग्णांना सुट्टी देण्यात आली असल्याची माहिती सरकारी सुत्रांनी दिली आहे. आज शुक्रवारी सायंकाळी प्रयोग शाळेकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण 84 संशयीत रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. तर 101 जणांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले असून आजपर्यंत एकूण 84 कोरोना बाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे.पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झालेल्या एकूण 84 रुग्णांमध्ये जालना शहरातील केवळ 7 रुग्णांचा समावेश असून उर्वरीत 77 रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. त्यात अंबड तालुक्यातील महाकाला येथील सर्वाधिक 39 रुग्णांचा समावेश असून शहागड 8,मुरमा 5, प्राथमिक आरोग्य केंद्र 4, आष्टी ता.परतूर 4,सरस्वती कॉलनी परतूर 4, वडीगोद्री, कुंभार पिंपळगाव प्रत्येकी 3, किंनगाव राजा ता. सिंदखेडराजा, लोणगाव, तिर्थपुरी, सोमाणी गल्ली,पोलीस चौकी मोंढा परतूर,मोंढा परतूर,समर्थ कारखाना येथील प्रत्येकी 1 तसेच जालना शहरातील रेल्वे वसाहत,अंबड चौफुली, बालाजी नगर , चंदनझिरा आणि SRPF जालना येथील प्रत्येकी एक तर नूतन वसाहत भागातील 2 रुग्ण कोरोना बाधीत आढळून आले आहेत असे सरकारी सुत्रांनी सांगितले आहे.

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

मराठवाडा

अखिल विश्व वारकरी परिषदेच्या प्रसिध्दी प्रमुख युवा तालुका अध्यक्षपदी अशोक कंटुले

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील पत्रकार अशोक कंटुले यांची निवड . ...
मराठवाडा

रघुनाथ मुकने यांच्या प्रयत्नातून मुरमा गावात मजुरांना जाॅबकार्ड वितरण

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे जालना जिल्हा घनसावंगी तालुक्यातील मुरमा खुर्द येथे रोजगार हमी योजना अंतर्गत ...
मराठवाडा

गोंधळी समाजातील सामाजिक कार्यकर्ते, जेष्ठ पत्रकार रामभाऊ उगले यांचे निधन

जालना‌ – लक्ष्मण बिलोरे मराठवाडा विभागाच्या,जालना जिल्ह्यातील गोंधळी समाजाचे सामाजिक कार्यकर्ते, जेष्ठ पत्रकार रामभाऊ हरिभाऊ ...
मराठवाडा

जालन्यात खा.रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी शेतकरी संघटनेचे राखरांगोळी आंदोलन

जालना -‌ लक्ष्मण बिलोरे कांद्यावरील निर्यातबंदी कायमस्वरूपी उठविण्यासाठी लोकसभेत शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी ...