महाराष्ट्र

लहान भाऊ च्या मृत्यू ची बातमी ऐकताच मोठ्या भावाचाही झाला मृत्यू ,

Advertisements
Advertisements

,

अमीन शाह ,

चीपळून

 – लहान भावाच्या मृत्यूच्या दु:खामुळे मोठ्या भावानेही जीव सोडल्याची घटना चिपळूणमध्ये घडली आहे. लहान भावाचा मृत्यू झाल्याचे समजताच मोठ्या भावालाही हृदयविकाराचा धक्का बसल्याने त्याचेही निधन झाले. दोन्ही सख्ख्या भावांचे एकाच दिवशी निधन झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

संदेश पवारला आज अचानक श्वसनाचा त्रास होऊ लागला. चिपळूणमधील दवाखान्यात कुठेही त्याला घेण्यात आले नाही. म्हणून कामथे येथे नेण्यात आले. मात्र तेथे त्याचा मृत्यू झाला. लहान भावाचा मृत्यू झाल्याचे समजताच मोठा भाऊ सुभाष पवार याला हृदयविकाराचा धक्का बसला. त्यानंतर त्याला खाजगी हॉस्पिटलमध्ये नेले असता त्याचाही तेथे मृत्यू झाला. लहान भावाच्या मृत्यूचे दुःख सहन न झाल्याने मोठ्या भावानेही आपले प्राण सोडले. संदेश पवार हा रिक्षा चालवीत असे. दोन्ही भावांच्या मृत्यूमुळे शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दोन्ही भावांचे स्वॅब घेण्यात आले असून त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल अद्याप समोर आलेला नाही. मात्र कुटुंबातील दोन कर्ती माणसे गमावल्याने पवार कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

महाराष्ट्र

अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हा सेक्रेटरी पदावर प्रा शिवाजी काटे यांची निवड

  निजाम पटेल , अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी , अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यकरणीस प्रांताध्यक्ष नामदार ...
महाराष्ट्र

जीवन गौरवचा अनोखा ऑनलाईन मुख्याध्यापक,शिक्षक गुणगौरव सोहळा संपन्न…!

ठाणे – प्रतिनिधी जीवन गौरव सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, क्रीडा क्षेत्राला वाहिलेले मासिक मार्फत आयोजित ऑनलाईन ...
महाराष्ट्र

शहरी व ग्रामीण पत्रकारांना ५० लाखांचे विमा कवच देण्याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा – विनोद पञे

पञकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्रात कोरोना काळात आरोग्य आणि पोलिस कर्मचाऱ्यांना 50 लाखाच्या विमाकवच ...