Home विदर्भ यवतमाळ जिल्हात कोरोनाबाधित एकाचा मृत्यु  व 33 पॉझेटिव्ह रुग्णांची भर

यवतमाळ जिल्हात कोरोनाबाधित एकाचा मृत्यु  व 33 पॉझेटिव्ह रुग्णांची भर

112

21 जणांना रुग्णालयातून सुट्टी

यवतमाळ , दि. 7 :- जिल्ह्यात शुक्रवारी एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाल्याने आतापर्यंत मृत्युची एकूण संख्या 38 झाली आहे. तसेच आज 33 नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली असून बरे झालेल्या 21 जणांना सुट्टी देण्यात आली आहे.

आज (दि. 7) मृत झालेली व्यक्ती ही यवतमाळ शहरातील 73 वर्षीय महिला आहे. तसेच जिल्ह्यात नव्याने आलेल्या 33 पॉझेटिव्ह रुग्णांमध्ये 20 पुरुष आणि 13 महिला आहेत. यात यवतमाळ शहरातील सिंधी कॉलनी, कवर नगर येथील एक पुरुष, काळे ले-आऊट, वडगाव येथील एक पुरुष, यवतमाळ शहरातील दर्डा नगर येथील एक पुरुष, संभाजी नगर येथील एक पुरुष, नेहरु चौक येथील एक पुरुष व दोन महिला, तसेच यवतमाळ शहरातील एक पुरुष, पुसद तालुक्यातील पारडी येथील एक पुरुष व एक महिला, पुसद शहरातील मोती नगर येथील दोन पुरुष व एक महिला, महात्मा फुले वॉर्ड येथील दोन पुरुष, आंबेडकर नगर येथील एक पुरुष व एक महिला, नवीन पुसद येथील दोन पुरुष व दोन महिला, पांढरकवडा शहरातील मेन रोड येथील एक महिला, आखाडा वॉर्ड येथील एक पुरुष, पांढरकवडा येथील एक पुरुष व तीन महिला, दिग्रस तालुक्यातील लाख येथील एक महिला, दिग्रस शहरातील श्रीराम नगर येथील एक महिला, ताज नगर येथील एक पुरुष, वणी शहरातील मोमीनपुरा येथील एक पुरुष, उमरखेड शहरातील जामा मशीद वॉर्ड येथील एक पुरुष तसेच जिल्ह्यातील अन्य ठिकाणचा एक पुरुष आज पॉझेटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यातील दोन कोरोनाबाधित रुग्णांना नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रेफर केल्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 337 ऐवढी आहे. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 1390 झाली आहे. यापैकी 1015 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 38 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 122 जण भरती आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत 23397 नमुने पाठविले असून यापैकी 19841 प्राप्त तर 3556 अप्राप्त आहेत. तसेच 18451 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.