जळगाव

भाजपा सरकार राम मंदिराच्या नावाखाली देशाला मुर्ख बनवत आहे – अजित एन.तडवी

Advertisements
Advertisements

रावेर (शरीफ शेख)

कोरोनाचे 500 रुग्ण होते तेव्हा लोकांना घाबरवून संपूर्ण देश लाँकडाऊन केला. आणि आता 16 लाख झाले तर अनलाँक केला. गेल्या पाच महिन्यांपासून लोकांना घरात बंद करून ठेवले.

त्यामुळे करोडो गोरगरीब, स्वयंरोजगार, मध्यमवर्गीय आणि व्यापारी लोकांचे प्रचंड हाल झाले. कधीही भरून न येणारे नुकसान झाले. जगण्याचे, उत्पादनाचे साधन बंद केले.
करोडो लोक बेरोजगार झाले.गावी जाताना लोक उपाशी व तडफडत मेले. हाँस्पिटल मधे रूग्णांचे भयानक हाल झाले आणि आजही होत आहेत. खाजगी हाँस्पिटल मधे लोकांची लुट केली जात आहे,

एका एका घरातील माणसे लागोपाठ मृत्यू पावले.लोक प्रचंड दुख:त आहेत.नवीन नोकरी धंदे देखील मिळत नाहीत.अजून वर्षे, दोन वर्षे लोकांना आपले जनजीवन निट करणे शक्य नाही. महागड शिक्षण पूर्ण करून वयातील कर्ती मुल बेकार फिरत आहेत.
आधीच भारतात लाखो मंदिर आहेत. ( ते ही सध्या बंद आहेत.) या संकट काळी एक ही देव धावून आला नाही. आज गरज आहे ती वैद्यकीय संशोधन आणि रोजगार केंद्रांची समाज शिक्षित झाला पण सुशिक्षित झाला नाही याचं दुःख आहे.
अशा भयानक परिस्थितीत मोदी सरकार राम मंदिराच्या नावाखाली लोकांना मुर्ख बनवत आहे.

देवा,धर्माच्या नावाखाली आपली फसवणूक केली जात आहे हे लोकांनी लक्षात घ्यावे.
जर हे माझे विधान असत्य असेल तर भाजपा सरकारने सत प्रमाणित करावे माझी भाजपा सरकारला खुल्ली चुनोती आहे.

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

जळगाव

नरेंद्र मोदी जीं च्या वाढदिवसानिमित्त मनियार बिरादरी तर्फे १८ मागण्याचे निवेदन

रावेर (शरीफ शेख)   माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त जळगाव जिल्हा मन्यार ...
जळगाव

अल्पसंख्यांक सेवा संघटने च्या जिल्हाध्यक्ष पदी सलीम इनामदार यांची निवड

रावेर (शरीफ शेख)  अल्पसंख्यांक सेवा संघटने ची प्रदेश कार्यालय शिवाजीनगर येथे प्रदेशाधयक्ष जहाँगीर ए खान ...
जळगाव

सामाजिक कार्यकर्ते सुमित पाटील यांचा “कोरोना वॉरीयर्स” सन्मानपत्र देऊन गौरव

रावेर (शरीफ शेख)  जळगाव तालुक्यातील वावडदा येथील सामाजिक कार्यकर्ते,गौरी गृपचे चेअरमन सुमित जानकीराम पाटील यांचा ...