
पोलिसांची मोठी कार्यवाही ,
अमीन शाह ,
बुलडाणा , राज्यात सर्वत्र लोकडाऊन सुरू असतांनाही जिल्ह्यातील खामगाव येथे पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात येथील midc परिसरातून 34 लाख रुपयांचा गुटख्या चा साठ्या सह एक आरोपीस अटक करण्यात आली आहे ,
या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार येथील midc परिसरात गुटख्याचा साठा असल्याची गुप्त माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांना मिळाली होती मिळालेल्या गुप्त माहिती वरून पोलिसांनी औधोगिक वसाहत येथे रात्री छापा मारून नजर कंपनी चा गुटखा 36 पोते , आर जे पान मसाला 5 पोते विना लेबल सिल्वर 5 पोते व इतर गुटखा असे मिळून 34 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी राजूश्याम घावंदे रा शनकर नगर यास अटक करण्यात आली आहे , पालकमंत्र्यांच्या जिह्यातच जोरदार गुटखा विक्री सुरू असून संबंधित विभाग या कडे डोळेझाक करीत आहे ,











































