महत्वाची बातमी

चिखली येथील राजमाता जिजाऊ स्मारक उपेक्षितचं…!

Advertisements
Advertisements

स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासनाचे दुर्लक्ष…

आदिल खान

चिखली :- चिखली तालुका मेहकर फाट्यावर असलेल्या राजमाता जिजाऊ स्मारक आज ही विकासापासून उपेक्षित आहे.
येथील स्मारकाची दुरवस्था झाल्याचे चित्र दिसून येत आहे. स्मारकासाठी बांधलेला निकृष्ट दर्जाचा ओटा पूर्ण पणे उखडून गेला आहे.स्मारका जवळ स्वच्छता नसल्याने माँ जिजाऊ भक्तांध्ये असंतोष निर्माण होऊ लागला आहे.
जयंती आली की जिजाऊ ची आठवण काढणारऱ्या चिखली येथील स्थानिक नेत्यांना आता मात्र माँ जिजाऊ स्मारकाचा विसर पडला आहे का? अशी चर्चा सुरू जिल्हा भर होत आहे;
माँ जिजाऊ स्मारक हे उघड्यावर असून साधे छत्र ही तिथे बांधलेले नाही,रोड च्या ठेकेदाराने सर्व टाकाऊ समान स्मारका जवळच आणून टाकले आहे.
परन्तु शासन, प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याने स्मारकाची हे अवस्था झाली आहे.
याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी, स्थानिक प्रशासन काही उपाययोजना करेल का? स्मारकाची स्वच्छता, उखडून पडलेला ओटा, हे दुरुस्त करण्यासाठी काही निर्णय घेतील का? हे सर्व प्रश्न अजून तरी अनुत्तरीतच आहे.
याबाबत संभाजी ब्रिगेड, बुलढाणा यांनी निवेदन दिले असून याची दखल घेतल्या जाईल का हे येणाऱ्या काही काळात स्पष्ट होईलच…

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

महत्वाची बातमी

पुराच्या पाण्यात अडकलेल्याना वाचवितांना एकाच दुर्देवी मृत्यू ,

पुराच्या पाण्यात अडकलेल्याना वाचवितांना एकाच दुर्देवी मृत्यू , अमीन शाह मेहकर तालुक्यातील दे , माळी ...
महत्वाची बातमी

पत्रकार सर्वांचा , मात्र संकट आल्यावर पत्रकारांचे कोण्ही नाही , पत्रकारांनो उघडा डोळे,नीट बघा –  “स्वतःकडे”

राम खुर्दळ पत्रकारांचे अनेक स्थर आहेत त्यातील बिनपगारी ( केवळ महिना से-दोनशे-पाचशे ) मानधनावर ,किंवा ...