Home महत्वाची बातमी कळंबकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी,चिंतेत वाढ करणारी

कळंबकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी,चिंतेत वाढ करणारी

105

सलमान मुल्ला

उस्मानाबाद ,

याबाबत सविस्तर माहिती अशी की उस्मानाबाद जिल्ह्यासह कळंब तालुक्यातील वाढते करण्याचे प्रमाण गेल्या दोन दिवसापासून कमी झाले होते परंतु बुधवार हा दिवस मात्र धक्कादायक दिवस बनला आहे.

कारण मंगळवारी पाठवण्यात आलेले 26 तर बुधवारी पाठवण्यात आलेले 27 तर रॅपिड अँटीजन टेस्टमध्ये 3 असे बुधवारच्या दिवशी 56 रुग्णांची भर पडली आहे. आणि ही कळबकरांसाठी धोक्याची बाब आहे.

यामुळेच नगरपालिका व तालुका प्रशासनाने 9 ऑगस्ट पर्यंत लावलेला जनता कर्फ्यु आणखी वाढतो की काय याचीच चिंता आता नागरिकांना पडली आहे..

काल दिनांक 6/8/2020 (बुधवारी) पाठवण्यात आलेल्या नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले आहे. त्यात आणखी 27 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत आहेत. या 27 जणांमध्ये रत्नापुर 17, मस्सा 6, कण्हेरवाडी, इटकूर, दहीफळ, येरमाळा प्रत्येकी एक जण पॉझिटिव्ह आहे.

त्यापैकी इटकूर येथील हा रुग्ण नवीन असून बाकीचे सर्वच रुग्ण हे पूर्वीच्या रुग्णांच्या संपर्कातील असल्याची माहिती, डॉ. शिंदे यांनी दिली.

.