Home जळगाव जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सत्तार मास्टर यांना सेवाभाव सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात...

जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सत्तार मास्टर यांना सेवाभाव सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले

127

रावेर (शरीफ शेख)

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व काँग्रेसचे वरिष्ठ नेते अब्दुल सत्तार मास्टर यांना नुकतेच युवा कल्याण प्रतिष्ठानच्या वतीने सेवाभाव सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
संपूर्ण जगा सह देशभरात कोरोना व्हायरस या आजाराने थैमान घातले आहेत या आजाराचे संसर्ग होऊ नये म्हणून पूर्ण देशात लाँकडाऊन लावण्यात आले होते संपूर्ण रोजगार बंद पडले होते अश्या संकटात बाहेरपुरा मोहल्ला येथील रहिवासी अब्दुल सतार मास्टर तेली यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी हातमजूरी करणारे व गोरगरिबांना दररोजच्या लागणारे वस्तू वाटप केले विशेष म्हणजे त्यांनी होमिओपथी औषधी मोफत वाटप करून सामाजिक एकात्मता चे चित्र निर्माण केले म्हणून त्यांचे सत्कार करून त्यांना शहरातील राणी लक्ष्मीबाई चौकातील सुन्नी दारूल कजा च्या कार्यालयात छोटेखानी कार्यक्रमात युवा कल्याण प्रतिष्ठानच्या तर्फे संस्था चे अध्यक्ष प्राध्यापक आशोक पवार सर प्रकल्प प्रमुख बन्सीलाल भगवान निवड समिती अध्यक्ष संदिप घोरपडे सर यांच्या हस्ते कोविड १९ सेवाभाव सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले यावेळी सुन्नी दारूल कजा चे अध्यक्ष फयाज पठाण कुरैशी,हमीद जनाब,रियाज शेख काँग्रेसचे उपाध्यक्ष राजु शेख सह आदि उपस्थित होते.