Home विदर्भ सानिका भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे – देवानंद पवार

सानिका भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे – देवानंद पवार

313

मुंबईतुन पुन्हा फोन
लातुरलाच प्रवेश
विधानभवनातुन हालचाल सुरु
तु फक्त काॅलेज सांग बाळा

देवानंद जाधव – मंगरूळ

यवतमाळ – बापाची तिरडी अंगनात, अन् लेक गेली परिक्षा केंद्रात “या भावविभोर मथळ्याखाली सर्वच माध्यमातून खबर प्रकाशित होताच, यवतमाळ तालुक्यातील हिवरी येथील गुणवंत सानिका जणु थेट विधानभवनातील विधानसभा अध्यक्ष मा नाना साहेब पटोले यांच्या दालनात पोहोचली, बापाच्या अंत्यसंस्काराची घरी तयारी सुरू असतांनाच त्याच दिवशी सानिका चा संस्कृत विषयाचा पेपर होता. त्या विषयात तिने १०० पैकी १०० गुण मिळवित अन्य विषयात ९८ टक्के गुण घेतले. ही बातमी विदर्भ प्रदेश किसान काॅग्रेसचे अध्यक्ष तथा लढवय्ये शेतकरी नेते देवानंद पवार यांनी विधानसभा अध्यक्ष नाना भाऊ पटोले यांचे कानावर घातली. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता तडक पञकार देवानंद जाधव यांचे भ्रमनध्वनी क्रमांकावर संपर्क करुन सानिका सोबत संवाद साधला. तुझ्या शिक्षणाची पुढील सोय करुन देण्याचे भाऊंनी अभिवचन दिले. त्याची पुर्तता करण्याच्या हालचाली मुंबई मधुन सुरु झाल्या आहेत. विधानसभा अध्यक्षांचे विश्वासु देवानंद पवार यांना सानिका सोबत बातचीत करुन, या विषयात हात घातला आहे. त्यांनी सानिकाच्या भ्रमनध्वनी वर संवाद साधत, तु फक्त काॅलेज सांग बाळा, कुठे शिकायचं, काय करायचं, तु म्हणशील तेथे तुझी शिक्षणाची सोय गेली जाईल, अशी पवार यांनी सानिका सोबत बातचीत केली, लातूरला नामांकित काॅलेज मध्ये तूला प्रवेश दिला जाईल या साठी मि विधानसभा अध्यक्षांचे सुचने प्रमाणे संबंधित जिल्हाधीकारी यांचे सोबत चर्चा करुन तूझा शिक्षणाचा मार्ग सुकर करणार असल्याचे देवानंद पवार यांनी सानिकाला काल दुपारी फोन वरुन सांगीतले. सामाजिक ऊत्तरदाईत्वाची जाण असणार्या नाना भाऊ पटोले, आणि शेतकरी नेते देवानंद पवार यांचे सानिकाच्या परिवाराने डबडबलेल्या डोळ्याने आभार मानले आहे.