Home जळगाव अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्ते व काँग्रेस कमिटीचे शहर उपाध्यक्ष राजु शेख यांना...

अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्ते व काँग्रेस कमिटीचे शहर उपाध्यक्ष राजु शेख यांना नुकतेच शहरातील युवा कल्याण प्रतिष्ठानच्या वतीने सेवाभाव सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले

126

रावेर (शरीफ शेख)

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्ते व काँग्रेस कमिटीचे शहर उपाध्यक्ष राजु शेख यांना नुकतेच शहरातील युवा कल्याण प्रतिष्ठानच्या वतीने सेवाभाव सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले

कोविड १९ जागतिक महामारीच्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा ना करता अश्या कठीण परिस्थितीत जनतेची सेवा केल्या बद्दल कसाली मोहल्ला येथील रहिवासी सामाजिक कार्यकर्ते व काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष मैराजोदीन अलाउद्दीन ऊर्फ राजु शेख यांना सुन्नी दारूल कजा च्या कार्यालयात छोटेखानी कार्यक्रमात युवा कल्याण प्रतिष्ठानच्या तर्फे संस्था चे अध्यक्ष प्राध्यापक आशोक पवार सर प्रकल्प प्रमुख बन्सीलाल भगवान निवड समिती अध्यक्ष संदिप घोरपडे सर यांच्या हस्ते सेवाभाव सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले यावेळी सुन्नी दारूल कजा चे अध्यक्ष फयाज पठाण कुरैशी,अब्दुल सत्तार मास्टर,हमीद जनाब,रियाज शेख सह आदि उपस्थित होते.