
मुर्दोसे क्या डरना , जिंदो का डर लगता है
लक्ष्मण बिलोरे – घनसावंगी
जालना – खोटे दस्तावेज तयार करून कब्रस्थान च्या जमीनीवर अतिक्रमण जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील पारडगाव येथील सर्व्हे क्रमांक 32 व गट क्रमांक 55 मधील ईरशाद चांदपाशा यानी खोटे दस्तावेज तयार करून कब्र स्थान वर ताबा केला आहे. ही जमीन निजाम काळापासून इतर हक्कात ईदगाह व कब्र स्थान आहे तरी स्वताच्या नावे खोटे दस्तावेज तयार करून जमीन नावे करून घेतली. लॉकडाऊन मध्ये जमीन मधला मुरूम अवैध मार्गाने विकू लागला तसेच कब्र वर नागर फिरू लागला तेव्हा गावकरी जागृत झाले. हे कळताच गावकऱ्यांनी प्रशासनाकडे धाव घेतली. तरी प्रशासना कडून काहीच हालचाली होत नसल्याने शेवटी लोकशाही मार्गाने उपोषणाला बसले पावसात उपोषण सुरू होते आखेर तहसील कडून हालचाली सुरू झाल्या लगेच नायबतहसिलदार गौरव खैरनार, आर. बी. माळी, देशपांडे यानी उपोषण कर्त्याला भेट दिली संबधित अतिक्रमण धारकास प्रतिबंध करण्याबाबतचे पत्र वरिष्ठांना पाठविण्यात येनार आहे आसे लेखी पत्र देवून उपोषण सोडविण्यात आले आहे. यावेळी नुरमिया कुरेशी, शब्बीर तांबोळी, सैय्यद कमरोददीन. कदीर कुरेशी, यासीन कुरेशी, तालेप कुरेशी, सादेक कुरेशी, आकबर सैय्यद. नजीर कुरेशी याच्या सह बागवान समाज, गवली समाज, तांबोळी समाज, उपस्थित होते











































