विदर्भ

पांढरकवडा आखडावॉर्डात डेंग्यूची साथ..!

Advertisements
Advertisements

नगर परिषद करीत आहे दुर्लक्ष..!

जिल्हाधिकारी ह्यांचे कडे तक्रार दाखल !

तहसीलदार ह्यांनी घेतली दखल !

ग्राहक प्रहार संघटनेने उचलला हा प्रश्न !

यवतमाळ – पांढरकवडा शहरात गेल्या आठ दिवसापासून डेंग्यूची साथ असून नागरिकांना लाखो रुपयांचा भुर्दंड लागत आहे .पुढील उपचारा साठी यवतमाळ,नागपूर,मुबई ला जावे लागत आहे .ह्या रोगाची प्राथमीक लक्षण पाहिले ताप येतो, पाय, कंबर ,अंग दुखायला सुरवात होते ,ह्यात आपले सल्लागार मलेरियाची ट्रीटमेंट तीन दिवस देतात नंतर सर्व प्रकारच्या टेस्ट करायला लावतात ह्यात तीन दिवस जातात त्यात डेंगू निघाल्यावर त्याला यवतमाळला रेफर केले जाते तो पर्यंत रुग्ण आजाराने परेशान झालेला असतो यवतमाळ ला त्या रुग्णाची आर्थिक लूट होते व त्या सर्व प्रकरणाला नगर परिषद प्रशासन जवाबदार आहे. डेंग्यूची ,कोरोनाची साथ शहरात सुरू असून केवळ डांबर रोडवर आठवड्यातून एकदा फवारणी केली जात आहे त्यात काय टाकून फवारणी करतात हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे कारण पांढरकवडा शहरात सपट्याने डेंग्यूची साथ पसरत असून यवतमाळ येथील मोठे रुग्णालय केवळ पांढरकवडा येथील रुग्णांनी भरल्याची माहिती सूत्रांनी दिली असून हे मोठे रॉकेट असून ह्याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे .
जनतेच्या जीवन मरणाचा प्रश्न उभा झाला असून नगर परिषद तोंडाला मास्क न लावलेल्या कडून दंड वसूल करण्याचे उद्दीस्ट समोर ठेवून कार्य करीत आहे असे दिसते .
पांढरकवडा वासी कोरोना मुळे परेशान आहे त्यात ह्या डेंग्यूची भर पडल्यामुळे पांढरकवडा शहरातील लोक इतरत्र राहायला जात आहे हे थांबविण्यासाठी जिल्हाधिकारी यवतमाळ ह्यांनी तातडीने पांढरकवडा शहराला भेट देऊन नगर परिषद प्रशासन नागरिकांच्या आरोग्याचे दृष्टीने काय करीत आहे ह्या बाबत चौकशी करणे गरजेचे आहे ह्या बाबत पांढरकवडयाचे तहसीलदार सुरेश कव्हले ह्यांचे शी संपर्क करून सर्व माहिती सादर केली असता ते अनभिन्न होते उदया तातडीने उपाय योजना होतील असे आश्वासन ग्राहक प्रहार संघटनेचे जिल्हा सचिव प्रसाद नावलेकर ह्यांना दिले तरी यवतमाळचे जिल्हाधिकारी ह्यांचे कडे निवेदन पाठविण्यात आले असून ह्या निवेदनावर ग्राहक प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष डॉ राजेंद्र आत्राम,जिल्हा सचिव प्रसाद नावलेकर ,जिल्हा संघटक बंडुभाऊ लवटे, मारेगाव चे अध्यक्ष सचिन मेश्राम ,पंकज नेहारे,प्रदीप भनारकर , घाटंजी चें मोरेश्वर वातीले आर्णी चे शेख सत्तार शेख रज्जाक,वणीचे विनोद कुचेरीया , पाटनबोरी चे जयंत बावणे,झरीचे मनोहर गेडाम सह अनेक सदस्यांच्या सह्या आहेत .शक्य झाल्यास जिल्हाधिकारी पांढरकवडा येथे दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

विदर्भ

संस्थात्मक अलगीकरणात राहण्यास इच्छुक नसलेल्या अतिसौम्य लक्षणे असणा-या रुग्णांना गृहअलगीकरणात राहण्याची परवाणगी

योगेश कांबळे वर्धा , दि.22 – सध्या जिल्हयात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत ...
विदर्भ

भांब (राजा) चा टोल नाका वाहन धारकांचे खिसे हलके करण्यासाठी सज्ज…!

देवानंद जाधव  यवतमाळ , (मंगरूळ) – नागपूर तुळजापुर या 361क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावर यवतमाळ पासुन बावीस ...