
रावेर (शरीफ शेख)
१ ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा करण्यात येतो. तर या दिना निमित्ताने आज यावल याठीकाणी महसुल दिना निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
तर या कार्यक्रमात निवासी नायब तहसिलदार संजय तायडे यांचा महसूल विभागात उकृष्ट काम केल्या बद्दल त्यांच्या आमदार शिरीष चौधरी उपजिल्हाधिकारी प्रविण महाजन , प्रांतधिकारी डॉ अजित थोरबोले, यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तर पीएम किसान अनुदान वाटपातील तत्परता, अश्या रावेर तालुक्यात शंभर टक्के महसूल वसूली, ओला दुष्काळ अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यासह अवैध गौण खनिजवर दंडात्मक कारवाई या बाबींमध्ये त्यांचे काम सरु राहिले आहे. फैजपुर विभागात सर्वात जास्त उकृष्ट काम केल्याने निवासी नायब तहसिलदार संजय तायडे हे अग्रेसर राहून कारवाई व वसूली केल्याची याची दखल आज दि १ ऑगस्टला महसूल विभागाने घेऊन त्यांना गौरवण्यात आले असून पुरस्काराने काम करण्यात अजुन मनोबल वाढेल अशी प्रतिक्रिया संजय तायडे,नायब तहसिलदार,रावेर यांनी दिली आहे .