August 5, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

भरधाव जाणाऱ्या ट्रकने चिरडून दुचाकीस्वार जागीच ठार , पालाईगुडा फाट्यावरील घटना..!

मजहर शेख

नांदेड / माहूर , दि. ०२:- माहूरकडून किनवट कडे भरधाव जात असलेल्या रेती वाहतूक करणाऱ्या ट्रक क्र.एमएच३ क्यू.४८०४ या ट्रकने दुचाकी ला जोरदार धडक देऊन चिरडल्याने गंगाराम मेघा राठोड वय ५० रा.वानोळा या इसमाचा जागीच मृत्यू झाला तर चिरडलेली दुचाकी ट्रकखाली घेल्याने पूर्णतः नाश झाली असल्याची घटना दि.२ ऑगस्ट रोजी सकाळी ७ :३० ते ८:०० दरम्यान माहूर किनवट रोडवर पालाईगुडा फाटा ते सिंदखेड चौरस्त्या जवळ घडली आहे.


सिंदखेड पोलीस ठाण्याचे सपोनी मल्हार शिवरकर व पोलीस कर्मचारी यांनी घटना स्थळी पंचनामा करण्यात आला.
वानोळा येथील मयत इसम हा गंगाजीनगर – करंजी येथील भाजीपाला बीट मधून भाजीपाला आणण्यासाठी करंजीकडे जात असतांनाच कोरोना लॉकडाऊनच्या विपरीत स्थितीत भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करीत असतांना काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. लॉकडाऊनमुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशांनुसार शनिवार व रविवारला सर्व बंद ठेवण्याचे आदेश असतांना करंजी येथे भाजीपाला बीट सुरु ठेवण्यास कुणी परवानगी दिली याबाबत घटनास्थळावर उलटसुलट चर्चा होत आहे.

Advertisements

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!