Home विदर्भ व्हॉट्सऍप ग्रुप-सुविचार-संस्कार कलश”च्या माध्यमातून गरजूंना मदतीचा हात

व्हॉट्सऍप ग्रुप-सुविचार-संस्कार कलश”च्या माध्यमातून गरजूंना मदतीचा हात

147

देवानंद जाधव

यवतमाळ – ग्रामिण भागातील एक कुटुंब… पती-पत्नी आणि एक छोटी मुलगी… दोघेही पती-पत्नी 100 % अंध आणि मुलगी पण… तरीही हे कुटुंब पोटाची खळगी भरण्यासाठी धावत्या रेल्वे मध्ये खेळणी विकायची… आणि पोटाची खळगी भरायची…. मात्र कोरोनाने सर्वत्र थैमान घातले आणि बस पासून विमानापर्यंत सारेच थांबले…. त्यात रेल्वेही थांबल्या आणि… या कुटुंबावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली… तर दुसरी व्यथा म्हणजे एक गरीब विधवा निराधार महिला की जिची शस्त्रक्रिया झाली आणि तिला तिच्या हातून काम करवेनासे झाले आणि लहानग्या 10 वर्षीय मुलास सांभाळून संसाराचा गाडा हाकने कठीण झाले….एक गतिमंद दिव्यांग तरुण… तो गतिमंद दिव्यांगच…म्हणून त्यास काम ते कोण देणार….असा हा गरीब आणि बेरोजगार तरुण… तर तीन हुशार मुलांना सांभाळत त्यांचे शिक्षण पुरे करू पाहणारी विधवा महिला… अशा या हातावर आणून पानावर खाणाऱ्या कुटुंबाची… अवस्था दैयनीय होऊ लागली… कोरोना अर्थात कोविड 19 च्या थैमानामुळे हाताशी काम नसल्याने कुटुंबाची अगदी उपासमार होऊ लागलीय.

आणि…. आणि म्हणूनच या कुटुंबास फुल ना फुलांची पाकळी मदत करण्याचा विचार समोर आला… कुटुंबाच्या भरण-पोषणासाठी शासन धान्य तर राशन दुकानातून देतंय… पण का केवळ रेशननी भागतं ? नाही ना; तर त्यास इतर साहित्यासाठी तरी पैशाची निकड भासतेच म्हणूनच त्या कुटुंबास एक नगद रक्कम देण्याचा विचार “सुविचार:संस्कार कलश” चे ग्रुप ऍडमिन विजयकुमार ठेंगेकर यांनी आपल्या ग्रुपवरती मांडला व एक विनम्र आवाहन केले. त्यास प्रतिसाद देत.

1. विजयकुमार ठेंगेकर
ग्रामसेवक, पंचायत समिती, आर्णी.
2. श्री सुनिल पाटील,
तलाठी, पवनी जि. भंडारा.
3. श्री नागोरावजी कोम्पलवार
मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा , तरोडा.
4. प्रफुल ठेंगेकर
विस्तार अधिकारी(पंचायत), पंचायत समिती, आर्णी.
5. श्री विनोदभाऊ गोडे
कृषी सेवा समन्वयक, यवतमाळ.
6. श्री सतीश आर.पंधराम
मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा , गणगाव
7. कु. सोनल गुघाणे
स.शि. मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा , गणगाव
8. श्री संजय ना. धारपवार
सामाजिक कार्यकर्ते, गणगाव
यांनी एकत्र येऊन एक 7,500/- चा निधी जमा केला.

आणि हा निधी आर्णी तालुक्यातील मौजा गणगाव येथील

1. श्री उमाकांत पांडुरंग पवार , या 100% अंध दिव्यांग गरजू लाभार्थ्यासह
2. श्री अभिलाष मुकींदा खेरे , या दिव्यांग लाभार्थ्यास
3. श्रीमती कविता उल्हास जाधव , या शस्त्रक्रिया होऊन घरी बसलेल्या आणि निराधार विधवा महिलेस…
4. श्रीमती संगीता शालीकराम मेसरे , या विधवा महिलेस सुविचार संस्कार कलश ग्रुप सदस्यांच्या उपस्थितीत देण्यात आला.

तर समाजऋण लक्षात घेऊन सहभाग नोंदविणाऱ्या सदस्यांचा ग्रुप ऍडमिन विजयकुमार ठेंगेकर यांच्याकडून ऋण निर्देश सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

या उपक्रमास आर्णी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी प्रफुल ठेंगेकर, जिल्हा परिषद मराठी शाळा , गणगाव चे मुख्याध्यापक सतीश पंधराम, जिल्हा परिषद मराठी शाळा , तरोडा येथील मुख्याध्यापक नागोराव कोम्पलवार, ग्रुप ऍडमिन तथा ग्रामसेवक विजयकुमार ठेंगेकर, गणगाव येथील प्रतिष्ठित शेषराव मेश्राम, संजय धारपवार, संतोष गावंडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन विजयकुमार ठेंगेकर यांनी तर आभार प्रदर्शन सतीश पंधराम यांनी केले. या कार्यक्रम यशस्वीतेसाठी अमोल धारपवार, प्रीतिताई आडे व मनिष पवार यांनी परिश्रम घेतले.