Home बुलडाणा चिखली पोलीस स्टेशनला कोरोना सुरक्षिततेचे महत्वपूर्ण साहित्य भेट

चिखली पोलीस स्टेशनला कोरोना सुरक्षिततेचे महत्वपूर्ण साहित्य भेट

195

प्रा , तंजिम हुसेन
चिखली – सध्या कोरोना या व्हायरसने संपूर्ण जग ग्रासलेले असतांना पोलीस बांधव आपली सेवा नागरिकांना तत्परतेने देत आहेत अश्या सेवा देण्यासाठी नॉन यु फार्मर वेलफेयर फाउंडेशनच्या माध्यमातून शेतकरी चळवळीतील रयत क्रांती संघटना पुढे सरसावली असून दि 29 जुलै रोजी चिखली पोलीस स्टेशनला तीन इन्फ्रारेड थर्मोमीटर गण, पल्स ऑक्सिमीटर, सॅनिटायझर डीस्पेन्सरी मशीन,हॅन्डक्लीन हॅन्ड वॉश,सॅनिटायझर, थ्री प्ले मास्क,एन 95 मास्क आदि महत्वपूर्ण साहित्य भेट म्हणून देण्यात आले,याआधी ही एस. के. लॉडर्स कॉस्मेटिक इंडस्ट्रीज द्वारे पोलीस प्रशासनाला मास्क व सॅनिटायझर पुरविण्यात आले होते,
कोरोनाच्या महामारीमुळे संपुर्ण जग हैराण झाले आहे आता तर कोरोनाचा शिरकाव हा ग्रामीण भागात ही फोफावतांना दिसत आहे,या कोरोना व्हायरस वर मात करण्यासाठी सर्व स्तरावर जोमात प्रयत्न सुरूच आहेत,जो तो आप आपल्या परीने कोरोना संकटात आपले योगदान देत आहे अश्यात च आरोग्याशी निगडित सर्व डॉक्टर, अधिकारी, कर्मचारी पोलीस बांधव आपल्या जीवाची बाजी लावून जनता व प्रशासन यांच्या मधील दुवा बनलेले आहेत,व घरा दाराची पर्वा न करता आपली सेवा देत आहेत ,यामुळे रयत क्रांती च्या पुढाकाराने नॉन यु सिड्स इंडिया लिमिटेडया कँम्पनीच्या माध्यमातून नॉन यु फार्मर फाउंडेशन च्या वतीने रयत क्रांती संघटनेचे विदर्भाध्यक्ष प्रशांत ढोरे पाटील व नॉन यु सिड्स कंपनीचे प्राँड्यक्शन मँनेजर विकास सुरवसे यांच्या प्रयत्नातून पोलीस प्रशासनाला महत्वपूर्ण साहित्य भेट देण्यात आले याप्रसंगी ठाणेदार वाघ साहेब,रयत क्रांती संघटनेचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष प्रशांत ढोरे पाटील जिल्हाध्यक्ष विनायक सरनाईक,प्रॉड्यकशन मँनेजर विकास सुरवसे,शेतकरी नेते उद्धव थुट्टे पाटील,पुण्यनगरी चे शहर प्रतिनिधी गोपालभाऊ तुपकर,केमिस्ट संघटनेचे शहराध्यक्ष स्वप्नील तायडे,शेतकरी नेते नितीन राजपूत,अनिल वाकोडे,बाळू पाटील,काकड साहेब,आघाव साहेब,अक्षय चिंचोले,संजय मिसाळ बबन केंधळे,सुशील ढोरे पाटील,रुद्राक्ष पाटील,मनोज जाधव,भारत जोगदंडे, जितेंद्र पाटील,अमोल जाधव,अमोल पबले,प्रभाकर जाधव,यशपाल लहाने, यासह बहुसंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.