Home जळगाव कोविड केअर हेल्प ग्रुप तर्फे शिवाजी नगर भागात आरोग्य तपासणी शिबीर संपन्न;...

कोविड केअर हेल्प ग्रुप तर्फे शिवाजी नगर भागात आरोग्य तपासणी शिबीर संपन्न; कोरोना लक्षणे आढळून आल्यास स्वतः पुढाकार घ्यावा – महापौर

131

रावेर (शरीफ शेख)

जळगाव शहरातील शिवाजी नगर भागात कोविड केअर हेल्प ग्रुप तर्फे आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबिरात शिवाजी नगर तसेच जवळील परिसरातील ७०० नागरिकांनी लाभ घेत उस्फुर्त प्रतिसाद दिला. कोविड केअर हेल्प ग्रुपचे कुसुंबा, मेहरुण, पाळधी, व शिवाजीनगर अशा विविध ठिकाणी शिबीर घेण्यात आले. पुढे देखील आरोग्य तपासणी शिबीर निरंतर घेण्यात येणार आहे असे ग्रुपच्या वतीने सांगण्यात आले. जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे ही वाढ थांबावी व जिल्हा कोरोना मुक्त व्हावा या उद्देशाने या कोविड केअर हेल्प ग्रुपची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये हेल्थ प्लस इन्स्टिट्यूट, स्वामी समर्थ ग्रुप, मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशन, कमलकेशव प्रतिष्ठान, सेवक सेवाभावी संस्था, सुर्या फाऊंडेशन, सच्ची निस्वार्थी शक्ती सेवा संस्था, भक्ती मेडिको, अमन रोटरी फाऊंडेशन, जे.सि.आय,काबरा फाऊंडेशन या सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य क्षेत्रात कार्य करणारी संस्था व डॉ. महेंद्र काबरा, डॉ.स्वाती सोनवणे,डॉ.शरीफ शेख,डॉ.सोनाली महाजन यांनी सहकार्य केले.
तसेच आरोग्य शिबिरात गरजू नागरिकांना मास्क, आर्सेनिक अलबम-३०, सँनिटाइझर व गरजू महिलांना सॅनिटरी पॅड,कोविड बाबत जनजागृती पत्रके वाटप करण्यात आले. यावेळी महापौर भारती सोनवणे यांनी नागरिकांना घाबरू नका काळजी ह्या व लक्षणे दिसून आल्यास स्वता पुढे यावे. असे आवाहन या वेळी केले.
जळगाव शहराचे महापौर भारती सोनवणे, स्वामी समर्थ संस्थेचे मनोज पाटील, नगरसेवक नवनाथ दारकुंडे, नगरसेविका गायत्री शिंदे, रोटरी क्लब स्टार धनराज कासट यांनी शिबिरास भेट दिली. भारती काळे, फिरोज शेख, विशाल शर्मा, हर्षाली पाटील, अर्चना सुर्यवंशी, निशा पवार, वर्षा पाटील, वैशाली शिंदे, अँड.अभिजीत रंधे, जिनल जैन, राकेश कंडारे, प्रशांत सुर्यवंशी, चेतन निंबोळकर, शकील अहेमद आदी उपस्थित होते.
धनश्री पाटील, किरण कोळी, उत्तम शिंदे, संजय सनस, धर्मेंद्र टेमकर, शाम कोंडाळकर, वसंत पोळ, जयश्री पाटील, मोहिनी सुरवाडे, दीपमाला बाविस्कर, भाग्यश्री पाटील, आश्विनी पाटील, राहुल पाटील, प्रशांत देशमुख, महेंद्र साळूंखे, समाधान निकम, शुभम सोनार, प्रसन्न कोळी, आकाश खैरे, संदीप यांनी परिश्रम घेतले.