Home जळगाव पारोळा मॉब लिंचिंग प्रकरण , वसीम खान व मोबीन शेख यांनी जळगाव...

पारोळा मॉब लिंचिंग प्रकरण , वसीम खान व मोबीन शेख यांनी जळगाव येथे प्रतिज्ञापत्र दाखल करून मुंबई उच्च न्यायालयात तक्रार सादर केली…!

40
0

अमळनेर कोर्टात त्रयस्थ म्हणून शामिल

रावेर (शरीफ शेख)

जळगाव जिल्ह्यातील पारोळा पोलीस स्टेशन अंतर्गत वसंतवाडी या गावात २२ जुलै रोजी रात्री दोन वाजता गुरांची गाडी घेऊन जाणारे मालेगाव येथील वसीम खान इंद्रिस खान वय २८ व शेख मोबीन शेख कलीम वय २६ यांना तेथील सरपंच व ग्रामस्थांनी झाडाला दोरखंडाने बांधून अमानुषपणे मारहाण केली होती त्या तक्रारीवर माननीय पोलीस अधीक्षक जळगाव यांनी संबंधित ग्रामास्था च्या विरोधात भारतीय दंड विधान कायदा ३०७ अन्वये कारवाई करून २५ जुलै रोजी एकोणावीस आरोपींना अटक करून २६ जुलै रोजी पारोळा न्यायालयात हजर केले असता पोलिसांनी पोलिस कोठडीची मागणी करून सुद्धा न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिली एवढेच नव्हे तर २७ जुलै रोजी त्या एकोणवीस आरोपींची जामिनावर मुक्तता केली वास्तविक पाहता भा द वि ३०७ कलम सेशन कोर्टाच्या अखत्यारीत येते तरीसुद्धा पारोळा न्यायालयाचे न्यायाधीश श्री एम के पाटील साहेब यांनी कायद्या विरुद्ध कारवाई केल्याने त्याबाबत जखमी चालक व क्लिनर यांनी अंमळनेर शेषन कोर्टात त्रयस्थ व्यक्ती म्हणून आमचे सुद्धा म्हणणे ऐकून घ्या अशी अपील फारुक शेख यांच्या सहाय्याने एडवोकेट शकील काझी यांच्यामार्फत अमळनेर कोर्टात दाखल केली व त्यावर ३० जुलै रोजी सुनावणी होणार आहे.
*प्रतिज्ञा पत्र दाखल*
सदर दोघी जखमींना घेऊन आज जळगाव येथे एडवोकेट अकिल इस्माईल यांनी दोघे जखमी च्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात तक्रार लिहून दिली असून सदर तक्रार नोटरी ॲडव्होकेट राहुल झंवर यांच्याकडे करून ती तक्रार सर्व कागदपत्रासह मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांना सादर करण्यात आली असून त्याची एक प्रत जळगाव येथील मुख्य न्यायाधीश यांना देण्यात आलेली आहे.

*हाजी गफ्फार यांची भेट*
जळगाव येथिल कामकाज संपल्यावर जखमी वसीम खान व मोबिन शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्यांक अध्यक्ष हाजी गफ्फार मलिक यांची भेट घेऊन त्यांचे सुद्धा आभार व्यक्त केले कारण त्यांनीसुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे या मॉब लिंचिंग ची तक्रार दाखल केलेली होती.
त्यांच्या सोबत जळगाव चे फारूक शेख, मुकीम शेख,हाजी नईम शेख, अनिस शाह, अनवर खान तसेच मालेगावचे तौसिफ खान ,नवीद अख्तर,सैयद नईम सैय्यद कलीम यांची उपस्थिती होती.
मालेगावकरांनी जळगाव करांचे आभार मानले.

Unlimited Reseller Hosting