August 4, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला प्रति लिटर १० रुपये वाढीव भाव व दूध भुकटीला ५० रुपये अनुदान मिळावे यासाठी भाजपाचे जिल्ह्यात एक ऑगस्ट रोजी रास्ता रोको आंदोलन

नांदेड, दि.३० ( राजेश एन भांगे ) :-
राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना व दूध उत्पादकांना अक्षरश: वाऱ्यावर सोडले. सध्याची निसर्गाची परिस्थिती व जनावारांच्या वाढलेल्या भरमसाठ किमती व उन्हाळ्यात निर्माण होणारा वैरणाचा प्रश्न हे सर्व पाहता दूध उत्पादक शेतकरी व दुध उत्पादक हा अतिशय अडचणीत सापडलेला असताना त्यांना महाराष्ट्र सरकारच्या वतीने कसलीच मदत मिळत नसल्यामुळे महायुतीच्या वतीने २१ जुलै २०२० ला राज्यभर शासनाला दुध भेट देऊन मागण्या मान्य नाही झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. परंतु आतापर्यंत दुध प्रश्नावर काहीच निर्णय न झाल्याने १ ऑगस्ट रोजी राज्यभर आंदोलन करण्याचे आवाहन महाराष्ट्र प्रदेश भाजपा व महायुतीच्या वतीने करण्यात आले. त्यानूसार नांदेड जिल्ह्यातील सोळा हि तालूक्यात मा.खा.श्री प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली व माजी मंत्री मा.भास्करराव पाटील खतगावकर, माजी मंत्री सुर्यकांताताई पाटील माजी मंत्री मा.डॉ.माधवराव पाटील किन्हाळकर आ.भिमराव केराम आ.राम पाटील रातोळीकर आ.डाॅ.तूषार राठोड आ.राजेश पवार माजी आ.बापूसाहेब गोरठेकर, माजी आ.ओमप्रकाश पोकर्णा, माजी आ.अविनाश घाटे यांच्या उपस्थितीत दुध उत्पादक शेतकऱ्यांचे दुध संकलन केंद्रावर न देता सरकारच्या विरोधात सुरक्षित अंतर ठेवून मास्क, सॅनेटायझरचा वापर करून भाजपा पक्षाचे व महायुतीचे पदाधिकारी,कार्यकर्ते दुध उत्पादक शेतकरी व संघटना सहभागी होऊन रस्ता रोको आंदोलन सर्व तालूक्यात तीव्र करावे असे आवाहन मा.खा. प्रतापराव पाटील चिखलीकर व भाजपा नांदेड जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, महानगराध्यक्ष प्रविण साले व आंदोलनाचे जिल्हाप्रमुख श्रावण पाटील भिलवंडे यांनी केले.

Advertisements

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!