Home नांदेड साखळी तोडण्यासाठी संपूर्ण सगरोळी सिल केले

साखळी तोडण्यासाठी संपूर्ण सगरोळी सिल केले

167

सगरोळी प्रतिनिधी

बिलोली तालुक्यातील सगरोळी येथे कोरोनि विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस प्रमाणात दिवसेंदिवस वाढत चालल्याने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक प्रशासन गावातील अस्थापने बंद ठेवून संपूर्ण गाव सिलबंद केले आहे.

सगरोळी गावात गेल्या चार दिवसापूर्वी एका व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली असतांना बाधीत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या चौदा जनांच्या स्वँबची तपासणी केली असता अहवालात अकरा व्यक्तीचे तपासणी अहवाल कोरोना बाधीत असल्याचे आढळून आल्याने गावातील नागरिकात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक प्रशासनाने कोरोनाची साखळी वेळीच तोडण्यासाठी खडबडून जागे होऊन गावातील जनतेच्या सुरक्षिततेच्यासाठी उपाययोजना करण्यास सुरवात केली असून दिनांक 29 जुलै 2020 रोजी गावातील आस्थापणे बंद ठेवून संपूर्ण गाव सिलबंद करण्यात आले. या कामात स्थानिक प्रशासनातील सरपंंच, वैद्यकीय अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, ग्रा.पं.सदस्य, पोलीस, आरोग्य कर्मचारी, परिचारीका, आशावर्कर आदींनी उपाययोजनेचे काम करतांना दिसून येत आहेत.