Home महाराष्ट्र बदलापूर (ठाणे) सुवर्णकार समाजातर्फे “संत नरहरी महाराज यांची जयंती” साजरी

बदलापूर (ठाणे) सुवर्णकार समाजातर्फे “संत नरहरी महाराज यांची जयंती” साजरी

229

आज दि.२८ जूलै मंगळवार रोजी श्रावणशुद्ध नवमी “संत शिरोमणी नरहरी महाराज” यांच्या जयंतीनिमित्त औचित्य साधून डिजिटल आँनलाईन गुगलमीट वेबनारच्या माध्यमातून बदलापूर-कुळगाव येथील ‘अहिर सुवर्णकार मंडळ ‘च्या वतीने “श्री संत नरहरी महाराज यांच्या प्रतिमेला मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र सोनार यांचे हस्ते प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.

महाराजांची “देवा तुझा मी सोनार”या अभंगाची ध्वनी फित दाखविण्यात आली. सदर कार्यक्रम मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र सोनार यांच्या घरी आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून “जन्मबंध “चे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर जी मोरे ( माहिम, मुंबई ),नवी मुंबई सुवर्णकार समाजाचे कार्याध्यक्ष श्री शांताराम सोनार सर( पाली, गणपतीचे), अनिलशेठ सुराजीवाले(ठाणे) , अशोक मंडलिक (ठाणे )हेमकांत सोनार(अलिबाग)तसेच गीतकार,रचनाकार अनिल जोजारे (औरंगाबाद) हे प्रमुख पाहुणे म्हणून आँनलाईन उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील जी विभांडिक यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. जन्मबंध चे संस्थापक अध्यक्ष श्री प्रभाकर मोरे यांनी आज श्री संत नरहरी महाराज यांच्या जयंती निमित्ताने नामस्मरण करून मंडळाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कोरोना(कोविड-१९) विषाणू मुळे कोणत्याही व्यक्तीला घराबाहेर जाता येत नाही. त्यामुळे मंडळाने आजचा संत नरहरी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे कौतुक केले. या नंतर श्री शांताराम सोनार सर यांनी संत नरहरी महाराजांविषयी प्रवचन स्वरूपात माहिती व भक्तीगीत सादर केले.
तसेच गीतकार अनिल जोजारे यांनी नरहरी महाराजांचे अभंग ( विठू तू सोनार नरहरीचा ) गाऊन कार्यक्रमाची शोभा वाढविली.
कार्यक्रमात याप्रसंगी मुंबई, ठाणे, पनवेल,पुणे, औरंगाबाद,अलिबाग तसेच बदलापूर ( ठाणे ) येथील सर्व सुवर्णकार समाज बांधव डिजिटल आँनलाईन गुगल अँपच्या माध्यमातून आपआपल्या घरी बसून या प्रसंगी डिजिटल आँनलाईन कार्यक्रमात बहुसंख्येने समाज बांधव सहभागी झाल्याबद्दल मंडळाचे सचिव पद्माकर सोनवणे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुनीलजी विभांडिक यांनी केले.