Home मराठवाडा गेवराई शहर अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद , अप्पर जिल्हाधिकारी यांनी दिले...

गेवराई शहर अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद , अप्पर जिल्हाधिकारी यांनी दिले आदेश ,

11
0

गेवराई शहरात तहसील रोड संभाजी चौक शिवसेना कार्यालय ते कुसुम किलनीक पर्यंत कंटेनमेंट झोन घोषित अनिश्चित कालावधीसाठी संचारबंदी लागू

गेवराई , दि, 18 :–गेवराई शहरात तहसील रोड संभाजी चौक शिवसेना कार्यालय ते कुसुम किलनीक पर्यंत कंटेनमेंट झोन आदेश लागू करणेबाबत येथे कोरोना विषाणूची लागण covid 19 positive झालेले रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे काही भागात कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आली असून फौजदारी प्रक्रिया दंड संहिता 1973 चे कलम 144 नुसार पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे, असे आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी यांनी दिले आहेत.

याबाबतचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी बीड यांनी दिला आहे त्यामुळे जिल्ह्यात इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून या भागात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.

गेवराई शहरात तहसील रोड संभाजी चौक शिवसेना कार्यालय ते कुसुम किलनीक पर्यंत कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. तसेच या दोन्ही ठिकाणी अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात येऊन संचारबंदी लागू करण्यात आली आहे