Home मराठवाडा बीड शहरातील आरोग्य सर्वेक्षणास गती देण्यासाठी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नागरिकांच्या...

बीड शहरातील आरोग्य सर्वेक्षणास गती देण्यासाठी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नागरिकांच्या दारात – कोरोना तपासणीसाठी कंटेनमेंट झोनमधील नागरिकांनी स्वतःहून पुढे येण्यासाठी थेट प्रयत्न

213

विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे

बीड , दि. १८ – जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार स्वतः बशीर गंज, बलभीम चौक व मिलिया कॉलेज परिसरात पोहोचले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी देखील या प्रयत्नात साथ देत प्रत्यक्ष नागरिकांच्या घरापर्यंत जाऊन आरोग्य सर्वेक्षणासाठी आणि तपासणीसाठी सहभाग देण्याचे थेट आवाहन आज केले

मागचे तीन दिवस आरोग्य विभागाच्या वतीने या क्षेत्रात नागरिकांच्या स्वब नमुने तपासणीचे साठी कार्यवाही करण्यात येत असलेल्या उपाययोजनांना अल्प प्रतिसाद मिळाला होता पण आज जिल्हाधिकारी श्री रेखावर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कुंभार यांनी थेट या क्षेत्रात भेट देऊन नागरिकांना आवाहन केल्याने एका दिवसात ६१९ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले

जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने कंटेनमेंट झोन मधील लोकांच्या व बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या परिसरातील व्यक्तींची तपासणीचे नियोजन केले आहे . यासाठी आरोग्य यंत्रणेला प्रोत्साहन देताना या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ आर बी पवार , बीडचे उपविभागीय अधिकारी टिळेकर आदी जिल्हा पातळीवरील अधिकाऱ्यांसह थेट कंटेनमेंट झोनमध्ये कार्यरत पथकातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्य पर्यवेक्षक यांच्यासमवेत येथील विविध भागात फिरून नागरिकांना मनातील भिती विसरुन आरोग्य विभागाला सहकार्य करण्यासाठी प्रेरित केले .

*बीड शहरातील कंटेनमेंट झोन मधील 5 हजार 356 नागरिकांपैकी ८४४ स्वॅब नमुने तपासणीचे नियोजन पूर्ण*

जिल्हा आरोग्य विभागाने बीड शहरात कोरोना बाधित आढळलेल्या परिसरातील कंटेनमेंट झोनमध्ये मोठ्या प्रमाणात स्वॅब नमुने तपासणीचे नियोजन आराखडा तयार केला होता यामध्ये शहरातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र मोमीन पुरा आणि पेठ बीड या दोन्ही अंतर्गत अनुक्रमे चार 4060 आणि 1296 इतक्या लोकसंख्येतील ८४४ नमुन्यांची तपासणी करण्यात आली

नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र मोमीन पुरा अंतर्गत नियुक्त केलेल्या पथकाद्वारे १०१५ घरांचे आणि पेठ बीड अंतर्गत ३९६ घरांचे सर्वेक्षण आणि तपासणी केली याचे थेट नियंत्रण जिल्हाधिकारी श्री रेखावर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कुंभार यांच्यासह जिल्हा पातळीवरील अधिकाऱ्यांकडे होते

मोमीन पुरा ना. प्रा. आ .के .अंतर्गत सहा कंटेनमेंट क्षेत्रांमध्ये ही तपासणी केली असून यामध्ये कारंजा टॉवर ते राजुरी वेस उजवी बाजू , सिटी हॉटेल ते धांडे गल्ली, कम वाडा, खंदक दक्षिण बाजू , खंदक पूर्व बाजू, अजीजपुरा ,जबरी मस्जिद, नगरी मस्जिद, बलभीम चौक ते किल्ला मैदान, माळी गल्ली , शिराळे गल्ली, इनामदार गल्ली, जुना बाजार ते कृष्ण मंदिर, कोतवाल चौक ते जुना बाजार ते हाफिज गल्ली या परिसरात झाली आहे

पेठ बीड ना.प्रा.आ. के. अंतर्गत कंटेनमेंट झोनची क्षेत्रामध्ये तपासणी केली आहे यामध्ये कटकट पुरा, कारंजा टॉवर ते राजुरी वेल डावी बाजू लोहार गल्ली ते कोतवाल गल्ली , बलभीम चौक ते पटांगण गल्ली, काळे गल्ली ते भंडार गल्ली, हनुमान मंदिर ते काळे गल्ली या भागात झाले.