Home विदर्भ येळाबारा शाळेत sms group द्वारे ऑनलाईन शिक्षण

येळाबारा शाळेत sms group द्वारे ऑनलाईन शिक्षण

108

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

यनतमाळ – जि.प.डिजिटल प्राथमिक शाळा येळाबारा शाळेचे सहाय्यक शिक्षक शिवचंद्र गिरी सर यांचा ग्रामीण भागातील शाळेसाठी अनोखा उपक्रम .
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद पण शिक्षण सुरू या धर्तीवर मुलांना आॕनलाईन शिक्षण देण्याचा सर्वांचा प्रयत्न आहे पण याला काही मर्यादा आहेत उदा. काही पालकाजवळ अॕन्ड्राईड मोबाईल नाही साधा फोन आहे मग त्यांच्या सोबत संपर्क साधण्यासाठी सोपा उपाय SMS मॕसेज द्वारे होमवर्क देणे !
मग काय आपण नेटपॕक मारतो त्यात 100 sms प्रती दिवस मोफत असतात !
चला तर मग आपल्या मॕसेजिंग मध्ये वर्गाप्रमाणे SMS group बनवा व एकाच वेळी मॕसेज सेंड करा !
sms group तयार करण्यासाठी साठी
फोन मधील contact मध्ये क्लिक करा
वरील बाजुस तीन आडव्या रेषा दिसतील त्यावर क्लिक करा ,
groups दिसेल त्यावर क्लिक करा ,
create group दिसेल क्लिक करा ,
group name लिहा व add member वर क्लिक करा ,
लिस्ट मधून वर्गाप्रमाणे सेव्ह नंबर टिकमार्क करा व नंतर save करा
झाला गृप तयार !
नंतर back जा
तुम्हाला तुमचा गृप दिसेल क्लिक करा
त्यावेळी बाजुला तीन डाॕटस् दिसतील त्यात send message दिसेल त्यावर क्लिक करा व मॕसेज टाईप करून एकाच वेळी सगळ्यांना सेंड होईल !
काही मोबाईल हॕन्डसेट मध्ये contact वर क्लिक केल्यावर खाली groups दिसेल त्यावर क्लिक करा ,
friends किंवा family वर क्लिक करा ,
वर बाजुला + या चिन्हावर क्लिक करा लिस्ट मधून काॕन्टक्ट select करा
खाली add ( ) दिसेल क्लिक करा
झाला गृप तयार !
send sms to group दिसेल क्लिक करा ,
select all करा
खाली send message दिसेल क्लिक करा ,
मॕसेज टाईप करा व send करा !
एकाच वेळी सगळ्यांना मॕसेज जाईल !
वर्ग१ला मराठी-पान नं.12 ,13 वरील रेषा गिरवा, गणित-पान नं.1 वरील लहान-मोठा व पान नं.2वरील मागेपुढे ओळखा व रंगवा, इंग्रजी पान नं.७ वरील वस्तू ओळखून त्याला काय म्हणतात ते सांगा.खेळ करू शिकू-माझी दिनचर्या पहा व तशी क्रिया समजून घ्या.
वर्ग 2रा मराठी -पान नं.३वरील चित्रातील फरक ओळखा,पान नं. 4 वरील चित्र बघ व चित्रात काय दिसते ते सांग, गणित-पान नं.1 वरील चित्रांमधील आकार शोधा व गाणे म्हणा , इंग्रजी-पान नं.६ व ७ वरील ABCD पहा व म्हणा, खेळ करू शिकू-माझी दिनचर्या पहा व तशी क्रिया समजून घ्या.
पहिली दुसरी साठी अशाप्रकारे होमवर्क sms message पाठविले जातात !
अशाप्रकारे वर्गाप्रमाणे होमवर्क sms messages तयार करून आपल्या sms group मधून आपल्या विद्यार्थ्यांना पाठवून मोफत sms सेवेचा लाभ घ्या ,नेटपॕक मारतांना त्यामध्ये रोज 100 sms मोफत पाठविण्याचे आॕफर असते ,त्याचा लाभ सर्व शिक्षकांनी घ्यावा !
शिवचंद्र गिरी यवतमाळ
स.शि.
जि.प.कें.प्रा.डिजिटल शाळा येळाबारा
पं.स.यवतमाळ जि.यवतमाळ
महाराष्ट्र शिक्षक मित्र