Home विदर्भ जन्मदात्या बापानेच आपल्या चिमुकल्या मुलीला मारून टाकले ,

जन्मदात्या बापानेच आपल्या चिमुकल्या मुलीला मारून टाकले ,

162

धक्कादायक घटना ,

अमीन शाह ,

नागपूर : पाण्याच्या ड्रममध्ये बुडवून वडिलांनीच केली ९ महिन्यांच्या चिमुकलीला जीवे मारल्याची धक्कादायक घटना नागपुरातील भांडेप्लॉट चौकात घडली. या घटनेमुळे परिसरात खळबड उडाली. चौकातील शंकर शाही मठाजवळ ड्रममध्ये चिमुकलीचा मृतदेह आढळला तर चिमुकलीच्या हत्येनंतर आरोपीनं बियरच्या बाटलीनं स्वत:चा गळा कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. स्थानिक आणि नातेवाईकांनी घटनास्थळी दाखल होत जखमी आरोपीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे.
सोनू इसराईल शेख ( ३२ वर्ष ) असे खून केलेल्या वडिलाचे नाव असून हा शंकर शाही मठाजवळ राहातो. तीन भावांचे संयुक्त कुटुंब आहे. गुरुवारी सोनूनं आपल्या ९ महिन्यांच्या चिमुकलीला पाण्याच्या ड्रममध्ये बुडवून तिची हत्या केली. त्यानंतर स्वत: बिअरच्या बाटलीनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र जखमी अवस्थेत असतानाचा कुटुंबियांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं. सध्या सोनूवर उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोनू हा चालकाचं काम करतो. कौटुंबिक कलहातून त्यानं हे धक्कादायक पाऊल उचललं असावं असा प्राथमिक अंदाज आहे. पाण्याच्या ड्राममध्ये बुडल्यानं चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून बिअरची बाटली चिमुकलीचा मृतदेह ताब्यात घेतला. दरम्यान आरोपी सोनूवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.