मराठवाडा

बलात्कार करणारा आरोपी निघाला करोना पॉझेटिव्ह पीडित व पोलीस आले गोत्यात ,

Advertisements
Advertisements

अँड , ताज अहेमद अन्सारी ,

गेवराई – एक महिन्यापूर्वी एका विवाहितेला पुण्याला पळवून नेऊन बलात्कार करणारा आरोपीच चक्क कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने एकच खळबळ उडाली आहे. माजलगांव ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी संपर्कात आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान येथील एका खाजगी दवाखान्यात गेवराई तालुक्यातील एका रुग्णाचा अनेक तास संपर्क आल्याने त्या दवाखान्यातील ९ जणांचे स्वॉब घेतले गेले आहेत.
तालुक्यातील जदीद जवळा येथील दोन मुलांचा पिता असलेल्या २६ वर्षीय तरुणाने चार मुलांची आई असलेल्या ३० र्षीय महिलेला १७ जून रोजी पुणे या ठिकाणी पळवून घेऊन गेला. त्यानंतर ८ जुलै रोजी तो त्या महिलेला घेऊन पुण्याहून परत आला व ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला. या वेळी महिलेने मला या व्यक्तीने पळवून नेऊन बलात्कार केल्याची फिर्याद दिली त्यावरून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दि. ९ जुलै रोजी आरोपीस न्यायालयात हजर केले असता त्यास पोलीस कोठडी व नंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
दरम्यान आरोपी हा पुण्यावरून आल्यामुळे त्याचा स्वॉब दि.१३जुलै रोजी घेण्यात आला त्याचा रिपोर्ट बुधवारी सकाळी पॉझिटिव्ह आल्याने पोलीस दलात एकच खळबळ माजली. ग्रामीण पोलीस ठाण्याचे १० ते १५ अधिकारी कर्मचारी व होमगार्ड यांचा सदर व्यक्तीशी संपर्क आला होता तसेच न्यायालयात देखील संपर्क आला असण्याची शंका आहे. यातील पीडित महिलेचा देखील बुधवारी डॉक्टरांनी स्वाब घेतला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ . अनिल परदेशी यांनी दिली. ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ नरके यांनी सांगितले की, आमच्या कर्मचाऱ्यांचे स्वॉब घेतले जाणार असून संपूर्ण पोलीस ठाणे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. तर न्यायालयात या आरोपीला दोन वेळा हजर करण्यात आल्यामुळे न्यायालयाला देखील पत्राद्वारे कळविण्यात येत आहे असेही नरके यांनी सांगितले.

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

मराठवाडा

पुरग्रस्तांच्या अन्नधान्य आणि निवाऱ्याची पुर्व व्यवस्था प्रशासन कधी करणार..???

गोदामायने केले रौद्ररूप धारण,२००६ची पुनरावृत्ती होण्याची शक्यता…! घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे पैठण – येथील जायकवाडी ...
मराठवाडा

….हा तर राज्य सरकारने मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे.

पोलिस मेगाभरती घोषणेच्या पार्श्वभुमीवर मराठा समाजातील तरूणांच्या संतप्त प्रतिक्रिया…!   घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे कुंभार ...
मराठवाडा

अंबड येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन करण्यास मान्यता – पालकमंत्री राजेश टोपे

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे  पोलिसवाला ऑनलाईन मिडिया जालना –  जिल्ह्यातील अंबड येथे जिल्हा व अतिरिक्त ...