Home महत्वाची बातमी हिंगोली जिल्हा परिषद सभापती रत्नमालाताइ चव्हाण यांनी सोमवार रोजी वसमत येथील पंचायत...

हिंगोली जिल्हा परिषद सभापती रत्नमालाताइ चव्हाण यांनी सोमवार रोजी वसमत येथील पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयात रात्र जागून काढली..

193

शिरीहरी अंभोरे पाटील

हिंगोली – हिंगोलीच्या सभापती रत्नमाला चव्हाण यांनी वसमत पंचायत समितीच्या कामकाजाविषयी नेहमीच जनते जनते नाराजीचा सूर व्यक्त होत असताना ऐकायला मिळाले होते अनेक लोकांच्या वसमत पंचायत समिती कर्मचारी अधिकार्‍याचे यांचे दुर्लक्ष होत असल्याचे ऐकायला मिळाले होते व अनेकांच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या त्यानुसार प्रयत्न मला ताई चव्हाण यांनी वसमत गटविकास अधिकारी साहेब यांना फोनवरून माहिती दिली मी वसमत पंचायत समितीमध्ये आले आहे आपण लवकर कार्यालयाकडे यावा.

कार्यालयाकडे यावा त्यानुसार त्यानुसार वसमत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरसे साहेब यांनी तुम्ही कार्यालयात बसा मी पाच मिनिटात येतो म्हणून निघून गेली पण रात्रीचे बारा वाजून गेले तरी वसमत पंचायत समिती गटविकास अधिकारी पंचायत समिती वसमत येथे कार्यालयात फिरकलेच नाही.

त्यामुळे हिंगोली जिल्ह्याच्या सभापती यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाली व सभापती यांना पाच मिनिटात येतो म्हणून निघून गेलेले वसमत पंचायत समिती जबाबदार गटविकास अधिकारी पंचायत समितीकडे फिरकलेच नाही तर जनतेच्या कामकाजाचा काय प्रश्न असू शकतो असा सवाल केला त्यामुळे संतापलेल्या चव्हाण यांनी आता वसमत पंचायत समिती कामकाजाचा समाचार घेण्याचे ठरवले आहे.