Home जळगाव चिनावल कुंभारखेडा रस्ता दुरुस्तीचे कामं प्रत्यक्षात सुरू …

चिनावल कुंभारखेडा रस्ता दुरुस्तीचे कामं प्रत्यक्षात सुरू …

422

कार्याध्यक्ष राष्ट्रवादी विलास ताठे यांच्या पाठ पुराव्याला यश, संबंधित ग्रामस्थांमध्ये संतोष…

रावेर (शरीफ शेख)

गेल्या अनेक दिवसांपासून चिनावल कुंभारखेडा हा रस्ता खूप मोठ्या प्रमाणावर खराब झाला होता , ह्या रस्त्यात जागोजागी खड्डे पडले होते,वाहन चालवणे डोकेदुखी ठरत होते . वाघोदा , चिनावल,कुंभारखेडा या गावांना जोडणारा एकमेव रस्ता हा दुवा आहे, या परिसरात केळी ची मोठी बाजारपेठ आहे ,या परिसरात दररोज चाळीस, पन्नास, ट्रक केळीची वाहतूक बाहेर राज्यात याचं मुख्य रस्त्याने मोठ्या प्रमाणात जड वाहनांनी केली जाते, या एका ट्रक चे अंदाजे दिडेश ते पावणे दोनशे विंक्ंटल वजन असते, तसेच मोठ्या संख्येने शेतकरी, बैलगाडी, ट्रक्टर ,रिक्षा सह मोटारसायकल यांनी नेहमीच रहदारी ने वापरत असतात, तसेच आताचं पावसाळ्याचीही सुरूवात झाली असून, यामुळे सर्व सामान्य जनतेला या नादुरुस्त रस्त्यामुळे जाणे येणे खुप जिकिरीचे होतं यामुळे
शेतकऱ्यांना मध्ये संतापाची लाट उसळली होती,
सदर रस्तयाचे काम लवकर लवकर सुरू झाल्याने तसेच संबंधित अधिकारी व ठेकेदार यांनी संवेदनशीलता दाखवून, तात्काळ रस्ता दुरुस्तीचे काम सुरू झाल्यानं कार्याध्यक्ष रावेर तालुका राष्ट्रवादी चे विलास ताठे यांच्या मागणीला यश आले, त्या बद्दल त्यांनी समाधान
व्यक्त केलं .

त्याचप्रमाणे ह्या रस्त्यांची दुरवस्था , शेतकऱ्यांना यांचे रहदारी चे महत्व लक्षात घेता कै हरीभाऊ जावळे यांनी तातडीने हा रस्ता दुरुस्त मंजूर करून घेतला होता, तरीही संबंधित अधिकारी व ठेकेदार यांनी वर्क ऑर्डर वर सहीसाठी बराचसा वेळ घेतला, तसेच मार्च महिन्यात वर्क ऑर्डर वर सही करूनही चार महिने होतं आले असून संबंधित अधिकारी व ठेकेदार यांनी रस्ता दुरुस्त कामं हाती घेतले नाही, यामुळे विलास ताठे कार्याध्यक्ष रावेर तालुका राष्ट्रवादी यांनी विद्यमान आमदार यांच्या रावेर तहसीलदार कार्यालयात जनता दरबार आयोजित वेळी शिरीष चौधरी यांच्या कडे ह्या रस्त्याचे डांबरीकरण लवकरात लवकर सुरू करण्यासाठी मागणी केली होती, आता तर संबंधित अधिकारी व ठेकेदार यांनी संवेदनशीलता दाखवून जबाबदारी, तत्परतेने या रस्त्याचे दुरूस्ती चे काम सुरू करावे, अशी मागणी संबंधित परिसरातील शेतकरी, सामान्य माणूस यांच्या कडून मोठ्या प्रमाणात होतं होती, असे न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही कार्याध्यक्ष रावेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विलास ताठे यांनी दिला होता.