Home बुलडाणा माय माऊलींची ओटी भरून वाढदिवस साजरा’ डोणगाव येथील श्री विठ्ठल रुखमाई ज्ञानपीठ...

माय माऊलींची ओटी भरून वाढदिवस साजरा’ डोणगाव येथील श्री विठ्ठल रुखमाई ज्ञानपीठ शाळेचे मुख्यध्यापक आत्माराम दांदडे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवत साजरा करण्यात आला.

168

डोणगांव

कोरोनाच्या काळात सर्वसाधारण लोकांची,मजूर वर्गाला हाताला काम नाही अश्यात जो तो आपल्या समस्यांनी ग्रासलेला आहे तेव्हा श्री विठ्ठल रुखमाई ज्ञानपीठ शाळेच्या मुख्य अध्यापक आत्माराम दादडे यांनी वाढदिवस न साजरा करण्याचा निर्णय घेतला मात्र सुबोध युवक कल्याण मंडळ व आत्माराम दादडे मित्र परिवार यांनी कोरोनाच्या काळात सामाजिक बांधिलकी जपून सोशल डिस्टन्सचा पालन करत वाढदिवस साजरा केला.
कोरोनाच्या काळात सामान्य माणूस खूप हतबल झालेला आहे तेव्हा श्री विठ्ठल रुखमाई ज्ञानपीठ शाळेचे मुख्य अध्यापक तथा सामाजिक कामात अग्रेसर असणारे आत्माराम दादडे सर यांचा वाढदिवस सुद्धा सामाजिक बांधिलकी जपतच साजरा करण्यात आला या वेळी सुबोध युवक कल्याण मंडळ चे अध्यक्ष शयलेश सावजी व आत्माराम दादडे सर मित्र परिवार यांनी माय माऊली यांची ओटी भरून वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला व ९ जुलै रोजी स्व सापणताई सावजी नगर मधील श्रीमंत बाप्पू सावजी सभागृहात सोशल डिस्टन्सचे पालन करून गावातील माय माउलीना पंच पक्वान्न भरवून ओटी भरून वाढदिवसाच्या दिवशी आशीर्वाद घेतले तेव्हा या आदर तिथ्याला भारावून माय माऊलींचे डोळे पाणावले व मनाच्या अंतकरणातून त्यांनी आत्माराम दादडे सरांना दिर्घआयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.