August 5, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

मेहकर व लोणार तालुक्यातील अवैध धंदे आणि गुटखा तंबाखू विक्री बंद करा.

मेहकर व लोणार तालुक्यातील अवैध धंदे आणि गुटखा तंबाखू विक्री बंद करा.

पालकमंत्री यांना घरचा आहेर,मेहकर व लोणार तालुक्यातील गुटखा तंबाखू अवैध धंदे बंद करण्या साठी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन.
तुम्ही बंद करता कि आम्ही अवैध व्यवसाय आणि गुटखा विक्री केंद्रवार धाड़ी टाकून अवैध व्यवसाय उध्वस्त करू असा प्रश्न उपस्थित केला.

डोणगांव ८ जुलै

जमीर शाह
बुलढाणा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असणारे मेहकर विधानसभा मतदार संघावर पोलीस प्रशासना सोबतच पालकमंत्री नामदार डॉ राजेंद्र शिंगणे यांचे लक्ष नसल्याचे त्यांच्याच पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्ष गिरधर ठाकरे यांनी पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या पत्रावरून दिसून येत आहे त्यांनी दिलेल्या निवेदनात सांगण्यात आले की मेहकर व लोणार तालुक्यात अवैध व्यवसाय सह बंदी असलेला गुटखा व तंबाखू खुलेआम जोमात विकली जात आहे यावर गुटखा राज्यातून हद्दबाहेर करण्याचा विडा उचललेले अन्न औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे काय आदेश देतील याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
अन्न औषध प्रशासन राज्यमंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांचा मेहकर येथील स्वतंत्र मैदान मध्ये नागरी सत्कार होता त्या वेळेस मंत्री महोदयानी अवैध गुटखा विक्री संदर्भात आपला निर्धार बोलून दाखविला होता आणि गुटख्या मुळे होणारी आरोग्याची हानी पाहता राज्यातून गुटखा विक्री हद्दबाहेर करण्याचा त्यांचा निश्चय त्यांनी बोलून दाखविला होता मात्र त्यांच्या जिल्ह्यातच ते गुटखा बंदी करू शकले नाही हे यांच्याच पक्षातल्या पदाधिकाऱ्याने पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनाने सिद्ध झाले.याच निवेदनात सगीतलेले आहे की अवैध व्यावसायस चालना देणाऱ्या अधिकाऱ्यांनची चौकशी करुण त्यांच्यावर गुन्हे दाखल करा अन्यथा आम्ही अष्ट्रवादी कोंग्रेस कार्यकर्ते अवैध व्यवसाय व गुटखा विक्री अड्यावर धाडी टाकू त्याला सर्वस्व जवाबदार प्रशासन राहिल असे निवेदनात नमूद आहे.
एकीकडे जिल्हा अधिकारी यांनी १ जुलै रोजी काढलेल्या पत्रात सरळ सांगितले की जिल्हात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी घातली आहे मात्र जिल्हा भरात गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ विक्री जोमात सुरू आहे एकीकडे तंबाखू व गुटखा खाऊन थुंकल्याने कोरोना वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही तेव्हा पालकमंत्री आपल्याच पदाधिकाऱ्यांच्या निवेदनाला अनुसरून काय कार्यवाही करतील. या कडे मतदार संघातील लोकांचे लक्ष लागले आहे

Advertisements

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!