Home जळगाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबई येथील निवासस्थान राजगृहावर अज्ञातांकडून तोडफोड करणाऱ्या व्यक्तीला...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबई येथील निवासस्थान राजगृहावर अज्ञातांकडून तोडफोड करणाऱ्या व्यक्तीला कडक शासन करण्यात यावे :- वंचित बहुजन आघाडी निवेदनाद्वारे मांगणी

184

रावेर (शरीफ शेख)

मुंबई – विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेले ‘राजगृहा’वर आज संध्याकाळी दोन अज्ञात माथेफिरू व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमऱ्यांची तोडफोड केली आहे. तसेच घराच्या काचांवरही दगडफेक झाली आहेत.यात घरातील कुंड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबई येथील निवासस्थान राजगृहावर अज्ञातांकडून तोडफोड करणाऱ्या व्यक्तीला कडक शासन करण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडी रावेर, भारिप बहुजन महासंघ, शहर आघाडी, महिला आघाड, युवक आघाडी, शहर आघाडी तहसिलदार, पोलिस निरिक्षक यांना निवेदनाद्वारे मांगणी करण्यात आली आहे. तहसिलदार उषाराणी देवगुणे, व सहाय्यक पोलीस निरिक्षक शितलकुमार नाईक यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की,राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात. इतकं महत्त्वाचे हे स्थान आहे. आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे.आणि आमची अस्मिता म्हणजे राजगृह आमचा वारसा म्हणजे राजगृह आमच्या अस्मितेवर भ्याड हल्ला करणाऱ्या मनुवादी बांडगुळ आणि जातीवादी पिलावळ यांचा जाहीर तीव्र निषेद करीत आहोत.
आणि पुरोगामी फुले शाहू आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात गेल्या चार पाच वर्षा पासून बौद्ध, ओबीसी, एस.टी.,एन.टी. व्हीजे एन.टी.या सामाज्यावर अन्याय होत आहे तरी गुंड प्रवृत्तीच्या लोकांना सरकार कठोर शासन करत नाही म्हणून पुरोगामी महाराष्ट्रामध्ये व भारतामध्ये दिवसनदिवस अन्याय होत आहे.
आरोपीचा तातडीने शोध घेऊन अटक करण्यात यावी व कठोर शासन करण्यात यावे असे निवेदन रावेर तहसिलदाराना वंचित बहुजन आघाडी रावेर, भारिप बहुजन महासंघ , युवक आघाडी शहर आघाडी, महिला आघाडी यांनी दिले. दिलेल्या निवेदनावर वंचित बहुजन आघाडी रावेर तालुका अध्यक्ष बाळु शिरतुरे, ता. उपाध्यक्ष सुरेश अटकाळे, ता. सचिव सलीम शाह, ता. सचिव बाळा शिरतुरे, ता . संघटक गौतम अटकाळे, नितीन तायडे, संतोष बिरपनकर, गोकुळ अटकाळे, किसन गाढे, दिलीप पानपाटील, कैलास धनगर,श्रावण पाटील, नरेद्र गाढे किशोर तायडे, किशोर सुरदास . सुकदेव तायडे, अनिल घेटे, राजेश रायमळे, धनराज घेटे, प्रदीप महाजन यांच्या सहया आहे.